जिल्ह्यातील अनाथ व गरजू मुलांना मा.यशवंत गोसावी यांच्या शिवनिश्चल ट्रस्ट कडून शालेय साहित्याची वाटप

0
463

जिल्ह्यातील अनाथ व गरजू मुलांना मा.यशवंत गोसावी यांच्या शिवनिश्चल ट्रस्ट कडून शालेय साहित्याची वाटप

प्रतिनिधी- अमोल मुसळे

मो-9405608508

उस्मानाबाद- आज उस्मानाबाद जिल्ह्यातील अनाथ व गरजू मुलांना शालेय वह्या पुस्तके , दप्तर शालेय ड्रेस व इतर साहित्याची वाटप करण्यात आली. यावेळी मदत करताना उस्मानाबादचे खासदार मा.ओमराजे निंबाळकर उपस्थितित होते तसेच संस्थेचे अध्यक्ष मा.यशवंत गोसावी तसेच अन्य पदाधिकारी उपस्थितित होते.अनाथ व गरजू मुलांना मदत करण्याचे हे सलग पाचवे वर्षं आहे*. या संस्थेतर्फे अनेक आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांना दत्तक घेऊन त्याच्या शिक्षणाचा, राहण्याचा व जेवणाचा सर्व खर्च केला जातो . व त्यांना आपल्या पायावर उभे राहण्यास मदत केली जाते.”कोणाच्या वेदनांना ‘भागीदार’ होता येत नसले तरी ‘साथीदार’ मात्र होता येते…!” या उक्तीप्रमाणे या संस्थेचे कार्य अविरत चालू आहे . याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here