भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांचे हस्ते राजुरा येथील क्रिकेट सामन्यांचे उद्घाटन संपन्न

0
299

भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांचेहस्ते राजुरा येथील क्रिकेट सामन्यांचे उद्घाटन संपन्न

 

श्री शिवाजी हायस्कूल राजुराच्या भव्य पटांगणावर भारतीय जनता पार्टी राजूरा तथा रॉयल क्रिकेट क्लब द्वारा आयोजित केलेल्या भव्य खुले टेनिस बॉल क्रिकेट सामन्यांचे उद्घाटन भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या शुभहस्ते आज पार पडले. प्रसंगीच त्यांनी प्रमुखांसह उद्घाटनीय सामन्याचा आनंदही घेतला.

याठिकाणी आलेल्या खेळाडू व संघांनी सांघिक वृत्ती जोपासत आपापल्या क्रिडाकौशल्याचे उत्तम प्रदर्शन करावे. विजयासाठी सर्वांना माझ्या शुभेच्छा असे प्रतिपादन याप्रसंगी मार्गदर्शनात त्यांनी केले.

यावेळी जिल्हा महामंत्री नामदेव डाहुले, माजी जि. प. सभापती तथा तालुकाध्यक्ष सुनिल उरकुडे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे, तालुका महामंत्री दिलीप वांढरे, विनोद नरेंदुलवार, विनायक देशमुख, माजी नगरसेवक राजू डोहे, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष सचिन शेंडे, जनार्धन निकोडे, प्रदिप बोबडे, सचिन भोयर, उमेश गोरे, मयुर झाडे, निलेश भोयर आदिंसह अनेक क्रिकेटप्रेमींची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here