बामणवाडा येथे ६५ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन तथा अशोक विजयादशमी उत्साहात संपन्न

0
596

बामणवाडा येथे ६५ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन तथा अशोक विजयादशमी उत्साहात संपन्न

राजुरा : मिलिंद संजोग मंडळ बामणवाडाचे वतीने १५ तारखेला सकाळी दहा वाजता बुद्ध विहार येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन व मानवंदना देण्यात आली.

कार्यक्रमाच्या सुरवातीला मिलिंद संजोग मंडळाचे अध्यक्ष धरमु किसन नगराळे, कोषाध्यक्ष अनिल लभाने, सचिव आशिष रामटेके, अंकुश वाघमारे यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून दीप प्रजवलन करण्यात आले. पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण केल्यानंतर सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली. गावातील बौद्ध उपासक व उपसिकांच्या बहुसंख्य उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here