लाॅयड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड तर्फे नवनिर्माण हनुमान मंदिराची स्थापना

0
424

लाॅयड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड तर्फे नवनिर्माण हनुमान मंदिराची स्थापना


घुग्घुस येथील लाॅईड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड उद्योगातर्फे कंपनीच्या परिसरातील गणपती मंदिराच्या बाजूला नवनिर्माण, हनुमान मंदिराची स्थापना करण्यात आली. यावेळी पूजा-अर्चना व हवन यज्ञाचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये मंदिराचे पुजारी व प्रकल्प प्रमुख दिनेश पाटीदार, वरिष्ठ उपाध्यक्ष प्रशांत पुरी यांच्या हस्ते हनुमान मूर्तीची पुजास्नान करण्यात आले.
त्यानंतर उद्योगातील कर्मचारी, कामगार, भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी प्रकल्प प्रमुख दिनेश पाटीदार, वरिष्ठ उपाध्यक्ष प्रशांत पुरी, एच.आर.उपाध्यक्ष पवन मेश्राम, मानव संसाधन व्यवस्थापक श्री. तरुण केशवानी, महाव्यवस्थापक (लाजिस्टिक) राजीव सिंह, सी.एस.आर अधिकारी रतन मेडा, सुरक्षा अधिकारी विपीन राइकवार, रमेश राधेराम, रवी बेले, मनोज बाविस्कर, प्रमोद नाकाडे, अक्षय थेटे, भा.म.संघ चंद्रपूर अध्यक्ष प्रमोद येलचलवार, भा.लाॅ.मे. संघ महामंत्री हिवराज बागडे, मनोज आत्राम, पिंकु भगत व कर्मचारी, कामगार परिसरातील नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here