इंधन दरवाढी निषेधार्थ काँग्रेसकडून सायकल रॅली आंदोलन

0
473

इंधन दरवाढी निषेधार्थ काँग्रेसकडून सायकल रॅली आंदोलन

हिंगणघाट (वर्धा):- अनंता वायसे प्रतिनिधी

 

केंद्रातील चुकीच्या धोरणांमुळे पेट्रोल, डिझेलच्या किमतीत प्रचंड प्रमाणात वाढ झाल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर फार प्रमाणात परिणाम पडला आहे. या दरवाढीमुळे एलपीजी गॅस, खाद्यतेल, फळ-भाज्या, किराणा यासह इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत वाढ झाली आहे. या महागाईमुळे सर्वसाधारण जनतेचे जगणे अवघड झाले असून दैनंदिन खर्च कसा करावा याचा प्रश्न पडला आहे. या जीवघेण्या महागाईच्या विरोधात वर्धा तालुका, शहर, महिला काँग्रेस कमिटी तसेच सर्व सेलद्वारे शहरातील मुख्य मार्गावरून सायकल रॅली काढून केंद्र सरकारच्या पूंजीवादी धोरणाचा निषेध करत आंदोलन केले.

 

ही सायकल रॅली सद्भावना भवन येथून सुरुवात होऊन शहरातील मुख्य मार्गाने जात महात्मा गांधी पुतळा येथे संपन्न करण्यात आली.

 

यावेळी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुधीर पांगुळ, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळाभाऊ जगताप, महिला काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्षा हेमलता मेघे, एससी सेलचे जिल्हाध्यक्ष धर्मपाल ताकसांडे, एसटी सेलचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर मडावी, शहर काँग्रेस कमिटीच्या महिला अध्यक्षा अरुणा धोटे, माजी सरपंच रोषणा जामलेकर, सोशल मीडिया प्रदेश सचिव अभिजित चौधरी, सोशल मीडिया अध्यक्ष चंद्रशेखर घोडे, जिल्हा संघटक अविनाश सेलुकर, शहर संघटक पंकज इंगोले, शहर उपाध्यक्ष विशाल हजारे, शहर उपाध्यक्ष नयन खंगार, राहुल गांधी विचार मंचचे विदर्भ अध्यक्ष अरविंद गजभिये, जिल्हा सचिव विजय नरांजे, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष सादिक शेख, शहर सचिव रोहित ताजणे, प्रभाकर धोटे, प्रवीण लुंगे, योगेश जांभूळकर, शोभा सातपुते, अर्चना कश्यप, दिपाली सातपुते, तनुश्री शुदरे, अमिषा मान, प्रतिमा जाधव, सोनाली कोपुलवार, सरोज सालबर्डे, निमा फुलबांधे, संगीता ढवळे, शितल शिंदे, प्रफुल कुकडे, घनश्याम कुमरे, शिशिर देशमुख, रवींद्र भुजाडे, कमलाकर शेंडे, विजय उबाळे, अभय खेळकर, बाळाभाऊ माऊस्कर, सुनील कोल्हे आदी बर्‍याच संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here