संगिताला न्याय मिळवुन देण्यासाठी वर्धेत निघाला बेलदार समाजाचा भव्य मोर्चा

0
434

संगिताला न्याय मिळवुन देण्यासाठी वर्धेत निघाला बेलदार समाजाचा भव्य मोर्चा 

 

 

वर्धा जिल्ह्यातील ‌तळेगांव येथील टालेटुला येथील मुळ रहिवाशी कु. संगिता मोहिते या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या करणा-या नराधमांना कठोर शिक्षा देण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी बेलदार भटका समाज संघटना महाराष्ट्र राज्य, विदर्भ बेलदार व तत्सम समाज संघटना जिल्हा शाखा वर्धा व अखिल भारतीय विमुक्त जाती, भटक्या जमाती वेलफेअर संघ दिल्ली महाराष्ट्र प्रदेश शाखेच्या समर्थनाने बेलदार समाजाच्या व विमुक्त जाती, भटक्या जमाती समाजाचे विविध संघटांनांनी २२ सप्टेंबरला वर्धा येथे भव्य मोर्चाचे आयोजन केले होते.

या वेळी एका शिष्टमंडळाने वर्धा जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षक वर्धा यांना उपरोक्त प्रकरण संदर्भात एक निवेदन सादर केले. गुरुवारी दुपारी १२.०० वाजता हा भव्य मोर्चा तानेलवार हॉल अँड लाॅन बोरगाव मेघे फार्मसी कॉलेज समोर हिंगणघाट रोड वर्धा शहर येथे सभागृहात निषेध सभा आटोपून शहरातील मुख्यमार्गाने निघून‌ तो जिल्हाधिकारी कार्यालयावर‌ धडकला.

या निषेध मोर्चात महाराष्ट्र व विदर्भातील विविध संघटनांचे नेते व पदाधिका-यांसह समाज बांधव प्रामुख्याने उपस्थीत झाले होते. सदर मोर्चाचे नेतृत्व रमेश जाधव (प्रदेश अध्यक्ष बेलदार भटका समाज महाराष्ट्र राज्य), राजु साळुंखे , भगवान चव्हाण, सुदाम पवार, प्रभू राज चव्हाण, संजय चव्हाण, सुकदेव मोहिते, रोहिदास चव्हाण, संतोष मोहिते, संतोष चव्हाण, राजू चव्हाण, हिम्मत मोहिते, कृष्णा जाधव, रवी चव्हाण, डी. डी. साळुंखे, दिलीप जाधव, यादव पवार, विनोद जाधव व चंद्रशेखर कोटेवार, (प्रांतीय अध्यक्ष विदर्भ बेलदार व तत्सम समाज संघटना मुख्यालय चंद्रपूर) आनंदराव अंगलवार, (महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष अखिल भारतीय विमुक्त जाती, भटक्या जमाती वेलफेअर संघ दिल्ली) मुकुंदा अडेवार, (संघर्ष वाहीनी नागपुर) अरविंद गंगुलवार यवतमाळ, संजय कोट्टेवार आदींनी केले.

मोर्चात समाज बांधव मोठ्या संख्येनी सहभागी झाले होते. दरम्यान हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी आयोजन समितीतील फुलचंद चव्हाण, अनील चव्हाण, सुधिर ताटेवार व चंद्रपूरचे आनंदराव अंगलवार यांनी एका प्रसिध्दी पत्रकातून समाज बांधवांना आवाहन केले होते. त्यांचे आवाहनाला समाज बांधवांनी उत्स्फुर्तंपणे प्रतिसाद दिला असल्याचे गुरुवारी दिसून आले. सदर मोर्चा हा जनतेचे लक्ष वेधून घेणारा असाच होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here