अपघाताचा बनाव करून दुहेरी हत्याकांड घडवणाऱ्या दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा !

0
644

अपघाताचा बनाव करून दुहेरी हत्याकांड घडवणाऱ्या दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा !

राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाची मागणी

 

वर्धा जिल्हा प्रतिनिधी: आर्वी तालुका(जिल्हा वर्धा) येथील रोहणा या गावी रोहणा-पिंपळखुटा फाट्यावर अपघाताचा बनाव करून झालेल्या दुहेरी हत्याकांडाची चौकशी करून दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा तथा चौकशीत हलगर्जी करून दोषींना वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पुलगाव पोलीस स्टेशनच्या संबंधित अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्याची मागणी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे विदर्भ अध्यक्ष नरेंद्र सोनारकर यांनी वर्धा जिल्हा पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

दिनांक 25 डिसेंबर 2021 रोजी भीषण आणि क्रूर अपघातात घरच्या दोन कर्त्या पुरुषांचा जीव गेला.आरोपी आणि मृतकांमध्ये जुना वाद असल्याने घडलेली घटना ही अपघात नसून पूर्व नियोजित कट असल्यामुळे या गंभीर घटनेची पुनरचौकशी करून दोषींवर पूर्वनियोजित कट रचून हत्या केल्याचा गुन्हा दाखल करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे विदर्भ अध्यक्ष नरेंद्र सोनारकर यांनी केली आहे.

काय आहे एकंदरीत प्रकरण?
दिनांक 25 डिसेंबर 2021रोजी सायंकाळी 5:30 वाजता मृतक अविष उर्फ बंटी विजय गाणार(24),विजय आकोसा गाणार(55) हे पिता-पुत्र दुचाकीने आपल्या शेतातून घरी परतत येत असतांना विरुद्ध दिशेने येणाऱ्या बुलेरो गाडी(क्र.M.H.32,A J 16 78) या भरधाव वाहनाने दोघांना अक्षरशः चिरडले.त्यात अविषचा घटना स्थळीच मृत्यू झाला.तर विजय गाणार यांचा रुग्णालयात नेत असतांना मृत्यू झाला. हा अपघात एवढा क्रूर होता की, चालकाने दुचाकीला 1 किमी पर्यंत फरकडत नेले.या बुलेरोत 2 ते 3 इसम बसले होते.आणि ही बुलेरो गाडी आकाश प्रभाकर वाढीवे चालवीत होता.मृतकांना चिरडल्या नंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपींनी सुसाट वेगाने घटना स्थळावरून पळ काढण्याचा व स्वतःचा बचाव करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला.मात्र अपघातग्रस्त दुचाकी गाडी ही बुलेरो ला अडकून असल्याने त्यांना 1 किमी अंतरावर थांबावे लागले.त्यामुळे बुलेरो गाडी क्रमांक,आणि गाडी मालका विषयी शेतातून घरी परतणाऱ्या लोकांना कळले.एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाल्याने पोलिसांना कार्यवाही करणे भाग पडले.

आरोपी आकाश वाढवे आणि मृतकांचा झाला होता वाद
मृतकांच्या शेतीत मिरचीचे पीक घेण्यात आले आहे.मिरचीचा तोडा करून तो मार्केट मध्ये विकण्याचा त्यांचा नियमित क्रम होता.त्यासाठी मृतक नेहमी आकाश वाढीवे यांच्या बुलेरो गाडीत आपला माल टाकून मार्केट मध्ये पाठवायचे.दरम्यान 15 दिवसांपूर्वी मृतकांनी 100 किलो मिरची या गाडीत टाकून मार्केट मध्ये पाठवली.मात्र 80 किलो मिरचीचा पैसा गाडी मालक आकाशने मृतकांना दिले.मार्केट रेट नुसार पैसे न मिळाल्याने,त्यातही 20 किलो मिरचीचा पैसा कमी मिळाल्याने मृतक आणि आरोपीमध्ये वादावादी झाली. त्यानंतर मृतकांनी आकाश वाढीवे याच्या गाडीवर आपला माल पाठवणे बंद केले.

आरोपी आकाश वाढवे यांनी गाडी चढवण्याची दिली होती धमकी
मृतकां कडून नगदी मिळत असलेले भाडे बंद झाल्याने आरोपी आकाश वाढीवे चांगळाच चवताळला होता.त्याने मृतकांना अंगावर गाडी चढवून मारण्याची धमकी दिली होती.या धमकी संदर्भात मृतक विजय गाणार यांनी आपल्या निकटवर्तीय व त्यांचे मेव्हूने सतीश पुंडलिक भगत (रा. पळसगाव बाई,ता.सेलू,जिल्हा वर्धा) यांनाहीं फोन वरून दिली होती. त्यामुळे घटना स्थळावरील सत्यता,अपघाताची क्रूरता,पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने वाहना सोबत पळून जाण्याचा केलेला प्रयत्न हा अपघात नसून,पूर्व नियोजित हत्याकांड असल्याचे स्पष्ट होते.

पुलगाव पोलिसांनी केली थातूर-मातूर चौकशी
या गंभीर प्रकरणी पुलगाव पोलिसांची चौकशीच संशयाच्या भोवऱ्यात सापडली असून,एवढी गंभीर घटना घडल्या नंतर पोलीस निरीक्षक शेळके यांनी घटना स्थळाला भेट देण्याचे सौजन्य न दाखवता जमादार लीलाधर उकंडे, सुधीर गवळी यांना घटना स्थळ पंचनामा करण्यासाठी पाठविले.गावात ‘हा अपघात नसून हत्या असल्याची’ जोरदार चर्चा असतांना पोलीस निरीक्षकांनी संवेदनशीलता दाखवत मृतकाच्या कुटुंबीयांना भेट देऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले नाही.उलट दिरंगाई केली.आरोपी आकाश वाढीवे ला शह देण्यासाठी वाहन चालक म्हणून वासुदेव उईके याचे नाव समोर केले.महत्वाचे म्हणजे प्रमुख आरोपी आकाह हा आपले वाहन कुणालाच चालवायला देत नव्हता.तथा त्याचे वाहन चालवण्यासाठी कोणताच नियमित पगारी वाहन चालक नियुक्त करण्यात आला नव्हता.मग घटनेच्या दिवशीच आरोपी आकाशने आपले वाहन वासुदेव उईके याला कसे दिले?असा मुद्दा प्रामुख्याने उपस्थित होत आहे.त्यामुळे पुलगाव पोलिसांनी या प्रकरणाची थातूर-मातूर चौकशी करून यातील प्रमुख आरोपी आकाश वाढीवे याला वाचवण्याचा प्रयत्न केला असल्याचे स्पष्ट होत आहे.म्हणून या प्रकरणाची पुनरचौकशी करून दोषींवर पूर्वनियोजित कट,कारस्थान रचून दुहेरी हत्याकांड घडवून आणल्याचा गुन्हा दाखल होणे अपेक्षित आहे.

आरोपी आकाश वाढवे आहे पोलीस पुत्र !
या हत्याकांडातील प्रमुख आरोपी हा आर्वी पोलीस स्टेशन येथे कार्यरत पोलीस कर्मचारी प्रभाकर वाढीवे यांचा मुलगा आहे.त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून,खून,बलात्कार यासारख्या गंभीर स्वरूपातील गुन्ह्यातून प्रभाकर वाढीवे यांनी आपल्या पुत्रा ला सुखरूप बाहेर काढल्याची चर्चा आहे.आरोपीचे वडीलच पोलीस खात्यात असल्याने त्यांना असलेले कायद्याचे ज्ञान,त्यांची पोलीस खात्यात असलेली ओळख याचा फायदा आरोपीला मिळण्याची दाट शक्यता आहे.किंबहुना तसे प्रयत्न पुलगाव पोलिसांनी केले आहेत.त्यामुळे या घटनेचा तपास पुलगाव पोलिसांकडून काढून घेऊन वरीष्ठ अधिकाऱ्यांमार्फत या घटनेचा पुनरतपास करून दोषींवर हत्येचा कट रचून दुहेरी हत्याकांड घडवून आणल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आम्ही करीत आहोत.
उपकृत घटना अपघात नसून पूर्वनियोजित कट कारस्थान रचून घडवून आणलेले दुहेरी हत्याकांड असल्याने आपण 8 दिवसाच्या आत योग्य, कायदेशीर आणि निसपक्ष चौकशी करून न्याय करावा,अशी मागणी सोनारकर यांनी केली असून,अन्यथा केंद्र सरकार मान्यता प्राप्त ‘राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ’ संपूर्ण महाराष्ट्रात या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन उभारेल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here