यवतमाळच्या भूमिपुत्राची मुंबईत गरुड झेप

0
564

यवतमाळच्या भूमिपुत्राची मुंबईत गरुड झेप

यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी : यवतमाळ जिल्हा शेतकऱ्यांच्या आत्महत्या चा जिल्हा म्हणून देशात ओळखला जातो. परंतु या जिल्ह्यातील काही कलाकारांनी व राजकीय लोकांनी आपले नाव राज्यात पोहोचले आहे. असाच यवतमाळ जिल्ह्यातील व दारव्हा तालुक्यातील कामटवाडा येथील राजू बरकत मलनस पटेल यांचे बद्दल सांगता येईल. राजू पटेल यांचे दहावी पर्यंतचे शिक्षण बोरी अरब येथे झाले. पुढे त्यांना अहमदनगर येथे सिविल हॉस्पिटल मध्ये प्रयोगशाळा सहाय्यक ची नोकरी मिळाली. परंतु त्यांचे नोकरी मध्ये मन रमले नाही आणि रिपाइं नेते रा. सु. गवई यांच्या संपर्कात येऊन त्यांच्या कार्यालयात काम करू लागले. त्यामुळे त्यांना सहाजिकच राजकारणाचे बाळकडू मिळू लागले. दिवसें दिवस त्यांची राजकारणातील आवड वाढू लागल्याने त्यांनी लोकाग्रहास्तव श्रीरामपूर या राखीव विधानसभा मतदार संघातून 1992 मध्ये आमदारकी ची निवडणुकी करिता नामनिर्देशन पत्र दाखल केले, परंतु रा.सु. गवई यांनी पटेल यांना थांबविले त्यामुळे नाराज होऊन पटेल यांनी आपला मोर्चा लोकसंग्राम पार्टीचे नेते अण्णा गोटे यांच्याकडे वळवला आणि अण्णा सोबत ते काम करू लागले त्यामुळे साहजिकच त्यांचा मुंबई येथे संपर्क वाढू लागला. राज्यातून आलेल्या लोकांची कामे करणे संबंधित खात्याचे अधिकारी, मंत्र्यांना भेटून जनतेची कामे करणे इत्यादी कामामुळे राजू पटेल यांचा मंत्रालयाचे अधिकारी/कर्मचारी व तसेच आमदार व मंत्र्यां सोबत जवळीकता निर्माण झाली. पुढे उदगीर लातूर चे आमदार रामभाऊ गुंडीले यांचे ते पी ए झाले. त्यानंतर ते लोकशासन आंदोलनाचे नेते माजी न्यायाधीश बी. जी. कोळसे पाटील यांच्या संपर्कात आले आणि त्यांच्यासोबत कामे करू लागले आज ते लोक शासन आंदोलनाचे समन्वयक म्हणून जबाबदारी सांभाळत आहे बी.जी. कोळसे साहेबां सोबत त्यांनी महाराष्ट्र मध्ये रेशन कार्ड चे प्रश्न, घरकुलाचे प्रश्न, निराधारांचे प्रश्न, भूमिहीन शेतमजुरांच्या अडचणी पडित जमिनीचे प्रश्न, बेरोजगारांच्या च्या नोकरीचा प्रश्न, आणि वनहक्क जमिनीचे प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविला. आज ही राजू पटेल है आपल्या यवतमाळ जिल्ह्यात कमी राहतात आणि मुंबईमध्ये जास्त राहताना दिसतात. त्यांचा मुंबईतील अनेक उद्योगपती, चित्रपटाचे निर्माता, निर्देशक व राजकारणातील मोठमोठ्या नेत्याशी वैयक्तिक संबंध आहे. अशा कार्यकुशल राजू पटेल यांचा नुकताच 1 मे हा वाढदिवस त्यांनी अत्यंत साधेपणाने चार मित्रां सोबत मुंबईत साजरा केला. पटेल यांनी आपले कार्यक्षेत्र मुंबई निवडले असले तरी यवतमाळ जिल्ह्यातील लोक समस्या व राजकारणा बद्दल आस्थेने माहिती ठेवतात गेल्या जुलै 2019 मध्ये मी मुंबईला विमानाने गेलो होतो त्यावेळी तत्कालीन कॅबिनेट मंत्री डॉक्टर अशोक उईके साहेब यांच्या निवासस्थानी थांबलो होतो सायंकाळी मी बाहेर पडलो असता माझे मंत्रालयातील मित्र श्री विलास राजूरकर अवर सचिव हे भेटले त्यावेळी ते माजी विधानसभा उपाध्यक्ष श्री मोरेश्वर राव टेमुडॆॅ साहेब यांच्या सोबत बोलत होते दरम्यान माजी आमदार रामभाऊ गुंडीले साहेब यांचे आगमन झाले व ते त टेमुडेॅ साहेबांशी बोलू लागले त्यावेळी त्यांचे पीए म्हणून राजू पटेल हे सुद्धा होते. त्यामुळे माझी राजू पटेल यांचेशी भेट झाली आणि त्यांचे कार्य बघून माझी त्यांच्याशी मैत्री झाली ती आजतागायत कायम आहे. राजू पटेल हे बाळासाहेब खैरे या व्हीआयपी ग्रुपचे सदस्य आहेत अशा हरहुन्नरी व यशाची शिडी दिवसें दिवस चढणाऱ्या राजू बरकत मलनस पटेल यांना त्यांच्या यशस्वी कारकिर्दीसाठी त्यांच्या 54 व्या वाढदिवसा निमित्त हार्दिक शुभेच्छा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here