कोरची येथील ग्रामीण रुग्णालयाला महिला स्त्रीरोग तज्ञ नियुक्त करा – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोरची यांची मागणी

0
524

कोरची येथील ग्रामीण रुग्णालयाला महिला स्त्रीरोग तज्ञ नियुक्त करा – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोरची यांची मागणी

वैद्यकीय अधिक्षकामार्फत जिल्हा शल्य चिकीत्सकांना दिले निवेदन

सुखसागर झाडे :- कोरची तालुका हा अतिशय दुर्गम संवेदनशील भाग म्हणून ओळखला जातो. कोरची तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये स्त्रियांच्या रोगांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात महिला स्त्रीरोगतज्ञ ची आवश्यकता असते. परंतु आत्तापर्यंत एवढा काळ निघून गेलेला असून स्त्रीरोग तज्ञाची कोरची येथील ग्रामीण रुग्णालयात नियुक्ती झालेले नाही. येथील ग्रामीण रुग्णालयात महिला स्त्रीरोगतज्ञ नसल्यामुळे काही महिला रुग्णालयात जाण्यास संकोच व्यक्त करतात. कित्येक वेळा महिलांना उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात किंवा बाहेरील जिल्ह्यात जाण्यासाठी लांबचा प्रवास करावा लागतो. त्यामुळे जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. कोरची येथील ग्रामीण रुग्णालयात महिला स्त्री रोग तज्ञाची अत्यंत आवश्यकता आहे. तरी लवकरात लवकर महिला स्त्रीरोग तज्ज्ञांची नियुक्ती करावी. या करिता कोरची तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने वैद्यकीय अधीक्षकांमार्फत जिल्हा शल्य चिकित्सक यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोरचीचे शहर अध्यक्ष अविनाश हुमणे, रा. यु. काँ. तालुका अध्यक्ष स्वप्निल कराडे, रा. यु. काँ. शहर अध्यक्ष चेतन कराडे, आनंद पंधरे, विनोद गुरणुले, अजय ताराम, राजेन्द्र भैसारे, प्रशांत कराडे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here