घुग्घुस येथे धम्मचक्र परिवर्तन दिन उत्साहात साजरा

0
396

घुग्घुस येथे धम्मचक्र परिवर्तन दिन उत्साहात साजरा

 

विशेष प्रतिनिधी/पंकज रामटेके
घुग्घुस येथील तहसील कार्यालया समोर आयोजित कार्यक्रमात व वार्डा-वार्डात बौद्ध विहार येथे मोठ्या उत्साहात धम्मचक्र परिवर्तन दिन साजरा करण्यात आला.

यावेळी तथागत भगवान गौतम बुद्ध आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ड्रॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी उपस्थित सर्व घुग्घुस येथील वार्ड, वार्डातील रॅली काढून,नारे देत सर्व समाज बांधवाना धम्मचक्र परिवर्तन, अशोक विजयदशमी दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

सर्व राजकीय पक्ष धम्मचक्र परिवर्तन, अशोक विजयादशमी रॅलीत सहभाग घेतला व तहसील कार्यालयासमोर आले.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी सम्राट अशोकाने ज्या दिवशी धम्मचक्र फिरविले होते त्याच मंगलदिनी त्या धम्मचक्राला डॉ. बाबासाहेबांनी गती दिली. तमाम जनतेच्या द्रुष्टीने ही अनन्य साधारण, कधीही न विसरण्यासारखी घटना आहे. म्हणून दरवर्षी अश्विन शुद्ध दशमीला हा दिन साजरा केला जातो. हा सण बाबासाहेबांच्या जीवनातील एक महत्वाची क्रांती आहे. या क्रांतीला जगात तोड नाही. म्हणुन अशोक विजयदशमी हा आनंदाचा सण आहे. अशी भावना याठिकाणी बोलतांना त्यांनी व्यक्त केली.

यावेळी जिल्हाध्यक्ष भाजप देवराव भोंगळे, पोलीस निरीक्षक बबन पुसाटे,भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे,काँग्रेस अध्यक्ष राजु रेड्डी,किसान जिल्हाध्यक्ष रोशन पचारे,समाज सेवक ईबादूल सिद्दिकी, भारतीय बौद्ध महसभा नगर शाखा घुग्घुस अध्यक्ष सुरेश मल्हारी पाईकराव, डॉ. सौरब सोनटक्के, रमाबाई सातारडे उपाध्यक्ष, चंद्रगुप्त घागरगुंडे कार्याध्यक्ष, भावनाताई कांबळे सचिव, हेमंत आनंदराव पाझारे विहार बांधकाम कोषाध्यक्ष, आशिष रमेश परेकर कोषाध्यक्ष, शरद पाईकराव विहार निर्माण, जय भीम युवा मंच, सारिपुत्त बौद्ध विहार अध्यक्ष अल्काताई चुनारकर, अमराई बौद्ध विहार अध्यक्ष अशोक रामटेके तक्षशीला जनजागृती महीला मंडळ चे अध्यक्ष सरोजताई पाझारे,अमोल थेरे, चिन्नाजी नलभोगा, प्रवीण सोदारी,कल्याण सोदारी,रवि शेषराव ठाकरे,दिनेश बांगडे, संजय भोंगळे, भारत साळवे, दिलीप कांबळे, सुनील राम, धनराज पारखी व बौध्द समाज बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here