श्री संत शिरोमणी रविदासजी यांच्या जयंती निमित्त निघालेल्या शोभायात्रेचे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने स्वागत

0
524

श्री संत शिरोमणी रविदासजी यांच्या जयंती निमित्त निघालेल्या शोभायात्रेचे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने स्वागत

शोभायात्रेत सहभागी समाज बांधवांना फळ वाटप


श्री संत शिरोमणी रविदासजी यांच्या जयंती निमित्त चर्मकार समाजाच्या वतीने शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. सदर शोभायात्रा गांधी चौक येथे पोहचल्यानंतर यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. यावेळी शोभायात्रेत सहभागी समाज बांधवांसाठी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने फळांची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, युवती प्रमुख भाग्यश्री हांडे, दुर्गा वैरागडे, कल्पना शिंदे, वंदना हजारे, स्मिता वैद्य, रजनी कुंभारे, सलीम शेख आदिंची उपस्थिती होती.

श्री संत शिरोमणी रविदासजी यांची जयंती चर्मकार समाज बांधवाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्त समाज बांधवांच्या वतीने शहरातुन शोभायात्रा काढण्यात आली होती. सदर शोभायात्रेचे स्वागत करण्यासाठी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने गांधी चौकात व्यवस्था करण्यात आली होती. ही शोभायात्रा गांधी चौक येथे पोहचताच यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिका-र्यांनी शोभायात्रेचे स्वागत केले. यावेळी श्री संत शिरोमणी रविदासजी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिका-र्यांनी शोभायात्रेत सहभागी समाज बांधवांना फळ वाटप करत त्यांना श्री संत शिरोमणी रविदासजी जयंतीच्या शुभेच्छा दिल्यात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here