पवनार ग्राम पंचायत प्रशासनाच्या हस्तक्षेपा मुळे पवनार – सेवाग्राम राष्ट्रीय महामार्ग क्र.353 आय रोडचे काम बंद झाल्याचा नागरिकांकडून आरोप

405
  • पवनार ग्राम पंचायत प्रशासनाच्या हस्तक्षेपा मुळे पवनार – सेवाग्राम राष्ट्रीय महामार्ग क्र.353 आय रोडचे काम बंद झाल्याचा नागरिकांकडून आरोप

*************************

पवनार-सेवाग्राम- हमदापूर-सेलडोह- आसोला-वाडी राष्ट्रिय राजमार्ग क्रमांक 353 आय चे 90% काम पूर्णत्वास आले आहे. पवनार गावा जवळील सिमेंट रोड चे काम अंतिम टप्यात आले असता ग्राम पंचायत पवनार द्वारे घरगुती पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन फुटणार असल्याचे बोलून महामार्गाचे काम ग्राम पंचायत पवनार प्रशासना कडून थांबविण्यात आल्याचे राजुरेशवर इंफ्रास्ट्रकचर बांधकाम कंपनी व महामार्ग अधिकारी यांच्या कडून सांगण्यात येत असून प्रशासकीय कामात अडथळा निर्माण होत असल्याने गावाचा होत असलेला विकास थांबत असल्याचं चित्र सद्या दिसून येत आहे.

**त्याच बरोबर उतम गालवा मेटॅलिक कंपनी भूगाव कडून* मोठ्या प्रमाणात कंपनी करिता लागणाऱ्या पाण्याची उचल पवनार येथील धाम नदीपात्रातून पाणी उपसा करून कंपनीला पाणी पुरवठा करण्याकरिता 2 मिटर व्यासाची लोखंडी पाईप लाईन टाकण्याचे काम सुरू आहे. उत्तम गालवा भूगाव या कंपनी ने ग्राम पंचायत पवनार कडे लेखी स्वरूपात ग्राम पंचायत पवनार च्या हद्दीतून पाईप लाईन टाकण्याकरिता नाहरकत प्रमाणपत्र मागण्यात आले असता, ग्राम पंचायत पवनार कडून काही अटी व शर्थी नुसार करारनामा करण्यात आला.

पवनार गावातील सुशिक्षित- बेरोजगार तरुणांना कंपनीत सामावून ध्यावे या मागणीचे वारंवार निवेदन हि गावातील सुशिक्षित बेरोजगार युवकांकडून देण्यात आले. त्यातच कंपनीकडून करारनाम्यात जस्या-जश्या कंपनी मध्ये जागा निघेल तसे – तसे कंपनीत पवनार येथील होतकरू सुशिक्षित बेरोजगार युवकांना सामावून घेण्याचे आश्वासन देण्यात आले तसे न केल्यास पवनार ग्राम पंचायत प्रशासना कडून ना हरकत प्रमाणपत्र रद्द करण्यात येईल असे लिखित स्वरूपात पवनार ग्राम पंचायत प्रशासना कडून घेण्यात आले असल्याचं ग्रामस्थ बोलत आहे. परंतु दोन महिने लोटून सुद्वा कंपनीने पवनार गावातील कुठल्याही युवकाला कंपनीत कामावर घेऊन नोकरी दिली नसून ग्राम पंचायत पवनार प्रशासने हित जोपासत परवानगी दिली असल्याचा आरोप पवनार ग्रामस्तांन कडून होऊ लागला आहे. उत्तम गालवा भूगाव कंपनीने युवकांना नोकरी तर दिली नाही परंतु,परंतु सी.एस.आर.निधीचा उपयोग करून ग्राम पंचायत पवनार ला लोकांना बसण्या करिता सिमेंट पासून निर्मित बाकडे देत पवनार येथील सुशिक्षित बेरोजगार असलेले तरुण बाकड्या वर बसून आपला रोजगार शोधणार का…? **हा संशोधनाचा विषय ठरत आहे*

पवनार – सेवाग्राम राष्ट्रीय राजमार्ग क्रमांक 353 आय मार्गा वरील मौजा पवनार येथील 78 लोकांच्या शेत जमिन,घर व खाली भूखंड (प्लॉट) मघील क्षेत्र संपादित करण्यात आले असून भूसंपादन प्रक्रिया सुद्धा पूर्ण झाली असून अतिम निवडा होऊन पवनार येथील 78 भुधारकाना संपादित क्षेत्र च्या मोबदला वाटप नोटीस सुद्धा मिळाल्या,परंतु **अद्याप फुटकी कवडी सुधा पीडितांना मिळाली* नसल्याने भुसंपदीत मोबदला मिळणाऱ्या भूधारकान मध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. सदर राष्ट्रीय राजमार्ग हा सेलडोह, सिंदी, दलप्तपुर,कांढळी, हमदापूर,चानकी, कोपरा, वघळा,सेवाग्राम, कामठवाडा,वरूड, केदारवाडी,पवनार इत्यादी 23 गावातून गेला असल्याने अद्याप भूसंपदीत मोबदला न मिळाल्याने काही नागरिकांनी बंड पुकारत बांधकामासाठी विरोधही केला, तर काही नागरिकांनचे म्हणे आहे की गावाचा विकास होत आहे मोबदला आज ना उद्या मिळणारच ! सदर रस्त्याचे खोदकाम सुरू असताना खोदकामा मध्ये ग्राम पंचायत पवनार प्रशासनाची घरगुती पाणी पुरवठा करणारी अडीच इंचाची पीव्हीसी पाईप लाईन फुटणार आहे त्या मुळे पहिले कंपनीने पाईप लाईन दुसरीकडे टाकून द्यावी मग काम करावे अशी मागणी पवनार ग्राम पंचायत प्रशासनाच्या वतीने केल्या जात आहे.

परंतु सदर पाईप लाईन टाकताना पवनार ग्राम पंचायत प्रशासनाने सार्वजनिक बाधकाम विभाग वर्धा, राष्ट्रीय महामार्ग विभागाची परवानगी घेतली किंवा नाही हे समजण्यास मार्ग नाही.श्री.वाघ मुख्य अभियंता पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद वर्धा, व संबधित श्री.झिंगे उपअभियंता पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद वर्धा यांना माहिती विचारली असता या बाबत आम्हाला काहीही माहिती नसल्याचं सांगण्यात येत आहे. गेल्या 2017-2018 मधे पवनार सेवाग्राम रोडचा डी.पी.आर तयार होऊन पवनार-सेवाग्राम रोड हा राष्ट्रीय राजमार्ग होणार असल्याची माहिती पवनार ग्राम पंचायत प्रशासनाला असून सुद्धा १ वर्षां पूर्वी घरगुती पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन महामार्गाच्या हद्दीत कशी काय टाकली असा प्रश्न सर्व सामान्य नागरिक करू लागले असून गावाचा विकास होत असून पवनार ग्राम पंचायत प्रशासन अडथळे निर्माण करण्यात अव्वल असल्याचं स्थानिक नागरिक बोलू लागले आहे. त्या मुळे गावाचा विकास ग्राम पंचायत प्रशासनाला बघवल्या जात नाही का असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे.

advt