समीर मलनस
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी
आर्णीः
आर्णी येथे मागील १० दिवसापासुन खरेदी-विक्री विभागाची सेवा ठप्प आहे. त्याचा फटका नागरिकांना बसला आहे. तहसील कार्यालयात खरेदी विक्री विभागात बी. एस. एन. एल. ची इंटरनेट सुविधा असल्यामूळे खरेदी विक्री चे काम बंद आहे. त्यामूळे समान्य नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. अशा परिस्थितीत तहसील कार्यालय कोणतीच पर्यायी सुविधा उपलब्ध करून न देत असल्याचे दिसुन येत आहे. आर्णी तालुका हा जिल्ह्यातील मोठा तालुका म्हणुन ओळखला जाते आर्णीला 110 खेडे जोडले आहे. अशा परिस्थितीत सेवा ठप्प झाल्याने नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत असल्याने नागरिकांमधुन संताप व्यक्त केला जात आहे.