श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा येथे राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेचे आयोजन

0
779

श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा येथे राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेचे आयोजन

शिवाजी महाविद्यालय व माजी विद्यार्थी संघातर्फे आयोजन

 

राजुरा : श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा व माजी विद्यार्थी संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने 8 जानेवारी 2022 रोज शनिवार ला सकाळी 11 वाजता “वाढत्या बेरोजगारीला व महागाईला शासनाचे धोरण जबाबदार आहे” या विषयावर राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेचे महाविद्यालयात आयोजन करण्यात आले आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची व सामाजिक वास्तव्याचे भान ठेवून विद्यार्थ्यांनी आपल्या वैचारिक प्रगल्भतेचे दर्शन घडवावे तसेच विद्यार्थी वर्गातील प्रतिमा, ज्ञान, पात्रता व स्पर्धात्मकता यांना उत्तेजन देणे आणि भाषण देण्याचे कौशल्य, संवादशैली हे गुण अधिक प्रभावित व्हावेत या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेत प्रत्येक महाविद्यालयातील कमीत कमी दोन स्पर्धक सहभागी होऊ शकतात. एका संघातून विषयाच्या सकारात्मक आणि नकारात्मक बाजूने मत मांडणारे दोन स्पर्धक विद्यार्थी असले पाहिजेत. स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही.

स्पर्धेत मराठी, हिंदी, इंग्रजी या तीनही भाषेमधून आपले विचार मांडता येईल. दुरून येणाऱ्या स्पर्धकांना निवासाची व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. या स्पर्धेत प्रथम पुरस्कार पाच हजार रुपये रोख रक्कम इम्पेरियल क्लासेस राजुरा कडून व स्मृतिचिन्ह संदीप खोके कडून, द्वितीय पुरस्कार चार हजार रुपये रोख रक्कम व स्मृतिचिन्ह स्व. काशिनाथ केशवराव ढुमणे स्मृतिप्रीत्यर्थ किरण ढुमणे, जीवन विमा डेवलपमेंट ऑफिसर यांच्यातर्फे राहणार आहे. तर तृतीय पुरस्कार तीन हजार रुपये रोख रक्कम स्मृतिचिन्ह आर. के. बुक डेपो राजुरा कडून तर प्रोत्साहनपर तीन बक्षीसे प्रत्येकी एक हजार रुपये, स्मृतीचिन्ह, प्रभारत्न होम डेकोर राजुरा केतन जुनघरी, रमेश झाडे ग्रामपंचायत सदस्य रामपूर, आई ड्रायव्हिंग स्कूल तर्फे अमोल राऊत यांच्याकडून बक्षिसे असतील. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येईल.

स्पर्धकांची नावे 6 जानेवारी 2022 पर्यंत स्वीकारल्या जातील. त्यानंतर कोणत्याही स्पर्धकांचे नाव घेतल्या जाणार नाही. स्पर्धकांनी डॉ. एस. एम. वरकड, प्राचार्य शिवाजी महाविद्यालय राजुरा – 9890018253, प्रा. डॉ. संतोष देठे, संयोजक, माजी विद्यार्थी संघ – 9975344296, बादल बेले, सचिव, माजी विध्यार्थी संघ – 8208158428, अविनाश दोरखंडे, अध्यक्ष, माजी विध्यार्थी संघ – 9226753232, प्रा. डॉ. नागनाथ मनुरे – 9960132120, प्रा. राजेश्वर चाफले – 9975602974 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजका मार्फत करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here