विरुरात बुद्ध जयंती मोठया उत्साहात साजरी

0
396

विरुरात बुद्ध जयंती मोठया उत्साहात साजरी


विरुर स्टेशन/अविनाश रामटेके
नवयुवक बौद्ध समाज मंडळ विरुर स्टेशन व पंचशील महिला मंडळ विरुर यांच्या संयुक्त विद्यमाने आज विरुरात बुद्ध पौर्णिमा निमित्य तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी बहुसंख्येने विरुर येथिल नागरिक उपस्थित होते.

प्रथम पंचशील चौकातील रमाई बुद्ध विहार येते संयुक्त बुद्ध वंदना घेऊन तथागत गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्या अर्पण करून सौ शोभा विशाल झाडे सचिव पंचशील महिला मंडळ विरुर यांच्या हस्ते धावजरोहन करण्यात आले त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय बाजार चौक येथे वंदना घेऊन शाहू नारनवरे अध्यक्ष नवयुवक बौद्ध समाज मंडळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करून उपस्थित नागरिकांनी तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करण्यात आले.

कार्यक्रमाचे संचालन बापूराव उपरे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करिता शाहू नारनवरे, गुलाब देठे, महिंद्र उपरे, सचिन पिपरे, प्रणय एरोजवर, अतुल उपरे, समीर देठे, प्रवीण ताकसंडे, संतोष उपरे, योगेश बक्षी, विक्की उपरे, प्रफुल खोब्रागडे सौ सुप्रिया ताकसांडे, रेखा वानखेडे, शोभा झाडे, वनिता ताकसंडे, शीतल देठे यांनी अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here