‘भिषण अपघात’ एकाच कुटूंबातील तिघेजण जागीच ठार

0
731

‘भिषण अपघात’ एकाच कुटूंबातील तिघेजण जागीच ठार

आष्टी चामोर्शी मार्गावरील उमरी गावच्या नाल्या जवळील दुर्दैवी घटना

चामोर्शी (गडचिरोली), सुखसागर झाडे
ब्रेकिंग न्यूज आष्टी-चामोर्शी मार्गावरील आष्टी पासून अवघ्या ३ किमी अंतरावर असलेल्या उमरी गावा जवळील नाल्या जवळ ट्रक व दुचाकीच्या भिषण अपघातात दुचाकीवरील तिघे जण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना आज ४ वाजेच्या सुमारास घडली.

सविस्तर वृत्त असे की, चामोर्शी वरून आष्टी कडे जाणाऱ्या ट्रक क्र. एपी16 टिवाय 6822 ने आष्टी वरून स्वगावी परतणारी दुचाकी क्र. एममच 33 वाय 4295 ला जबर धडक दिली. यात दुचाकीस्वार तिघे जण जागीच ठार झाले.

मृतकात चामोर्शी तालुक्यातील सुरज बालाजी कुसनाके (३५) रा. मुधोली रिठ, ललिता रितेश कुसणाके (२५) व रितीका रितेश कुसनाके (४) यांचा समावेश आहे. यामध्ये ललिता कुसनाके व रितीका या मायलेकी असून सुरज हा दिर आहे.

मृतक सुरज कुसनाके हा आपल्या वहिनी व पुतणीस दवाखान्यात उपचारासाठी घेऊन गेला होता. उपचार करून परतत असताना काळाने कुसनाके कुटुंबीयावर घाला घातला. सदर अपघात इतका भिषण होता की, ४ वर्षीय रितीका चा मेंदू अक्षरश: बाहेर निघाला तर दुचाकी जळून खाक झाली. सदर घडलेल्या या दु:खद प्रसंगामुळे परिसरात व मुधोली रिठ वासीयांकडुन शोककळा व हळहळ व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here