शेतकऱ्याची कर्जाला कंटाळून गळफास घेऊन केली आत्महत्या राजुरा तालुक्यातील येरगव्हाण येथील घटना

0
632

शेतकऱ्याची कर्जाला कंटाळून गळफास घेऊन केली आत्महत्या

राजुरा तालुक्यातील येरगव्हाण येथील घटना

राजुरा । अमोल राऊत

राजुरा तालुक्यातील येरगव्हाण येथे आज दुपारला 2 वाजेच्या आसपास 60 वर्षीय शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना घडली.
गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव शत्रुघ्न पुंडलिक बावणे असे आहे. त्यांच्या मागे 1 मुलगा, 3 मुली, पत्नी आणि 3 नातवंड असा आप्त परिवार आहे.
सिडीसीसी बँकेच्या कर्जाला कंटाळून घरीच त्यांनी आत्महत्या केली. ओल्या दुष्काळामुळे शेतपिकाला मोठा फटका बसला आहे. यामुळे ते नापीक व कर्जामुळे सतत चिंतेत राहत होते. त्यांच्या अचानक या निर्णयामुळे त्यांच्या कुटुंबियांवर आभाळ कोसळले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here