लम्पी रोगाचा प्रादुर्भाव आणि गोवंशीय जनावर तस्करी

0
621

लम्पी रोगाचा प्रादुर्भाव आणि गोवंशीय जनावर तस्करी

जिल्हा प्रशासनाची केविलवाणी अनभिज्ञता

 

चंद्रपूर, 21 सप्टें. : लम्पी रोगाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील 5 गावे बाधित क्षेत्र म्हणून घोषित करत 5 किलोमीटर परिसरातील 44 गावे सतर्कता क्षेत्र म्हणून घोषित केली आहेत. आणि पुढील आदेशापर्यंत जिल्ह्यातील जनावरांचे बाजार, यात्रा, पशुप्रदर्शने, खरेदी-विक्री व वाहतुकीस प्रतिबंध करण्यात आला आहे. देशात लम्पी रोगाची लागण होऊन मोठ्या प्रमाणात जनावरांना जीव गमवावा लागला आहे. जिल्हा प्रशासनाकडून लम्पी रोगासबंधात कायद्याच्या अमलबजावणीमध्ये सुसंगत कृती न करणाऱ्या व अडथळा निर्माण करणाऱ्या पशुपालक, व्यक्ती, संस्था प्रतिनिधी यांच्यावर नियमानुसार गुन्हा दाखल करणे तसेच कार्यवाही प्रस्तावित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी निर्गमित केले आहेत.

जिल्ह्यात लम्पी रोगाचा शिरकाव झाल्याने यावर लगाम लावण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत असताना जिल्ह्याच्या तेलंगणा सीमावर्ती भागातून खुलेआम जनावरांची कत्तलीसाठी निर्दयतेने वाहतूक होत असताना याबाबत जिल्हा प्रशासनाची केविलवाणी अनभिज्ञता दिसून येत असल्याने जिल्हा प्रशासनाची उदासीनता, असंवेदनशीलता सुजाण नागरिकांत संभ्रम निर्माण करणारी ठरत आहे.

गोवंशीय जनावर तस्करी होत असलेल्या ठाणे हद्दीतील पोलीस यंत्रणेवर व त्या निर्दयी तस्करांवर जिल्हा प्रशासकीय यंत्रणा निष्पक्ष कारवाईचा बडगा उगारेल का…? हा अनाकलनीय यक्ष प्रश्न जिल्हा वासीयांपुढे निर्माण झाला आहे. लम्पी रोगाने थैमान घातल्यानंतर जिल्हा प्रशासनाने लावलेल्या निर्बंधाला तिलांजली देऊन मुजोरीने होत असलेली तस्करीचा आश्रयदाता कोण…? यात प्रशासकीय अधिकारी पांघरून घालत आहे की, राजकीय वर्चस्वाने यावर कारवाई साठी प्रशासकीय यंत्रणा धजावत नाही. नेमके पाणी कोठे मुरतेय…? राज्यातील चंद्रपूर जिल्ह्यात गोवंशीय जनावर तस्करीचे मोठे नेटवर्क असल्याने हे न उलघडणारे कोडेच निर्माण झाले आहे. जिल्हा प्रशासन यावर कोणती भूमिका घेईल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे…

 

लम्पी रोगाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील 5 गावे बाधित क्षेत्र म्हणून घोषित

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here