जिल्हा परिषद सदस्या मेघाताई नलगे यांना तात्काळ अटक करा! बिरसा क्रांती दल चंद्रपूरने केली निवेदनातून मागणी

0
859

जिल्हा परिषद सदस्या मेघाताई नलगे यांना तात्काळ अटक करा!

बिरसा क्रांती दल चंद्रपूरने केली निवेदनातून मागणी

अमोल राऊत: राजुरा(चंद्रपूर):- जिल्हा परिषद सदस्या मेघा नलगे यांच्याविरुद्ध देवाडा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. डुडूले यांनी आज पहाटे पोलीस स्टेशन राजुरा येथे ऑट्रासिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मात्र अजूनही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. सदर आरोपीची चौकशी करून तात्काळ अटक करण्याची मागणी बिरसा क्रांती दल चंद्रपूरने निवेदनातून केली आहे.
डॉ. डुडूले हे प्राथमिक आरोग्य केंद्र देवाडा येथे मागील एक वर्षांपासून कार्यरत असून ते परिसरातील नागरिकांना उत्तम सेवा देत आहेत. काल डॉ. डुडूले सेवा बजावीत असताना नलगे यांनी आरोग्य केंद्रात जाऊन त्यांच्यवर चप्पल उगारत जातीवाचक शिवीगाळ करत अपमानित केले. मात्र डॉ. डुडूले यांच्या तक्रारीनुसार राजुरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद न करता केवळ ऑट्रासिटी अंतर्गत गुन्हा नोंदविला असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.
शासकीय कामात अडथळा करणे, अडविणे असे गंभीर आरोप नलगे यांच्यावर असताना कलम 153 अन्वये गुन्हा नोंद होणे आवश्यक होते. यामुळे अन्याय झालेल्या डॉक्टरांना योग्य न्याय मिळेल असे राजुरा पोलीस स्टेशन यांच्या कार्यवाहितून दिसून येत नाही. त्याचप्रमाणे ऑट्रासिटी अंतर्गत गुन्हा असतानाही आरोपीला अजूनपर्यंत अटक झालेली नाही. हि बाब अतिशय गंभीर असून आरोपिची चौकशी करून तात्काळ अटक करण्यात यावी अन्यथा आदिवासी बांधवांकडून आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here