युवा संकल्प संस्था यांनी “माझे कुटुंब माझी जबाबदारी” या मोहिमेची केली जनजागृती.
सुखसागर झाडे
चामोर्शी :- कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने सुरू केलेल्या “माझे कुटूंब माझी जबाबदारी” या मध्ये त्यांनी जनतेसाठी सांगितले आहे की, आपण स्वतःची काळजी घेणे तसेच आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी,बाहेरून कार्यक्रमांमधून आल्यानंतर अंघोळ करून कपडे थेट एका बादलीत ठेवावे,सर्दी, खोकला असल्यास रुग्णालयात जाऊन तपासणी करून द्यावी, मास्क नाकाला व तोंडाला झाकलेला असावा, हात साबण वापरून स्वच्छ धुवावे, इ. माहिती जनतेस सांगितलेली आहे.

या मोहिमेला हातभार म्हणून युवा संकल्प संस्था,भेंडाळा व्दारा संचालित युवा संकल्प बोरी यांनी घरोघरी जाऊन जनजागृती केली व कुटुंबियांना या मोहिमेची पुरेपूर माहिती दिली तसेच माझे कुटूंब माझी जबाबदारी या मोहिमे अंतर्गत जी प्रतिज्ञा आहे ती सुद्धा घेण्यात आली. त्यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.राहुल वैरागडे, उपाध्यक्ष मा.चेतन कोकावार युवा संकल्प बोरी ग्रुप चे प्रमुख मा.प्रनील कुकुडकर,चेतन सरपे, पंकज पिटाले,चेतन सोमनकर आणि गावकरी उपस्थित होते.