कामगारांचे प्रश्न व समस्या साेडविण्यासाठी या पुढे ही माझे प्रयत्न सुरुच राहील – सूरज ठाकरे

0
598

कामगारांचे प्रश्न व समस्या साेडविण्यासाठी या पुढे ही माझे प्रयत्न सुरुच राहील – सूरज ठाकरे

किरण घाटे

चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व सामान्य जनतेचे तथा कामगारांचे प्रश्न व समस्यां साेडविण्यासाठी मी सदैव प्रयत्न शिल राहील असे स्पष्ट मत नवनियुक्त स्वाभिमान पक्षाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सूरज ठाकरे यांनी आज इम्पँक्ट २४ न्यूज चैनलच्या जिल्हा प्रतिनिधीशी बाेलतांना व्यक्त केले.
राजुरा विधान सभा क्षेत्रात आज ही कामगारांचे अनेक प्रश्न प्रलंबित असुन या पुर्वि आपण त्या कडे (निवेदनातुन) प्रशासनाचे लक्ष वेधले असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. काल प्रहार जनपक्षातुन बाहेर पडल्यानंतर ते आज प्रथमच इम्पँक्ट २४न्यूज चैनलीशी बाेलते झाले. माेठ्या प्रमाणात तरुणांची फाैज आपल्या पाठिशी उभी असल्यामुळे कुठलेही आंदोलन उभे करण्यांस आपणांस अडचण निर्माण हाेत नाही. चंद्रपूर जिल्ह्यातील आपल्या उल्लेखनिय व भरीव कामगिरीमुळेच स्वाभिमान पक्षाने जिल्हाध्यक्ष पदाची महत्वपूर्ण जबाबदारी आपल्यावर साेपविली असल्याचा आवर्जुन उल्लेख सूरज ठाकरे यांनी शेवटी (आपल्या बाेलण्यातुन) केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here