बिबि येथील पुरुष मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

0
548

बिबि येथील पुरुष मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

जिल्ह्यातील 168 स्पर्धकांचा सहभाग

प्रा. आशिष देरकर यांच्या वाढदिवसानिमित्य आयोजन

 

नांदाफाटा/कोरपना, नितेश शेंडे
बिबी येथे प्रा. आशिष देरकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रसंत युवा मंडळ बिबी व प्रा. आशिष देरकर मित्रमंडळ बिबीच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 16 ऑक्टोबर ला बिबी येथे वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केलं होते. आयोजकांच्या वतीने पुरुष मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले गेले. मॅरेथॉन स्पर्धा दोन गटात संपन्न झाली. स्पर्धेला सकाळी 8 वाजता सुरवात करण्यात आली. यामध्ये जिल्हाभरातील 168 स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग घेतला. त्यामध्ये ‘अ’ गटातून प्रथम क्रमांक वृषिकेश सोनवने, द्वितीय ओम ढवळे व तृतीय क्रमांक मोहीत उरकुंडे यांनी पटकावला. तर ‘ब’ गटामध्ये
महेश वाढई प्रथम, रितिश सिंग ठाकुर द्वितीय तर प्रणील लांडे यांनी तृतिय क्रमांक प्राप्त केला. सर्व विजयी स्पर्धक हे चंद्रपूर येथील होते. स्पर्धेत सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणात देण्यात आले. कार्यक्रमाला प्रा. आशिष देरकर, संजय गांधी निराधार समिती चे अध्यक्ष उमेश राजूरकर,शैलेश लोखंडे, डॉ. स्वणेश चांदेकर, आणि इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शामकांत पिंपळकर, विठ्ठल टोंगे, नरेंद्र अल्ली, गुणू काकडे,सतीश जमदाडे, नितेश शेंडे, कल्पतरू कनाके, सोमेश्वर आत्राम, संतोष मडकाम, अखिल अतकारे, स्वप्नील मुंगूल, व राष्ट्रसंत युवा मंडळ बिबी च्या सर्व सदस्यांचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here