सुरजागड’ च्या नावावर दलाल झाले मालामाल, पाठींब्यासाठी अनेकांनी दिली जात आहे रसद

0
550

‘सुरजागड’ च्या नावावर दलाल झाले मालामाल

पाठींब्यासाठी अनेकांनी दिली जात आहे रसद

 

गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील बहुचचिॕत सुरजागड लोह खाण सध्या एका वेगळ्याच गोष्टीने चचिॕत आहे. कधी ग्रामसभांचा विरोध तर कधी राजकीय नेत्यांची आडकाठी हा विषय नविन राहीला नाही.माञ, गेल्या काही दिवसापासून दलालांच्या अनोख्या कामाची चचाॕ जिल्ह्यात चविने सुरु आहे. विरोध आणि पाठींबा यासाठी जोरदार रस्सी खेच सुरु असून यासाठी मोठया प्रमाणात रसद पुरविली जात असल्याची चचाॕ आहे. काहींना एक रक्कमी तर काहींना मासीक हप्ता सुरु झाल्याच्या चचेॕने आता खदानीत हात धुण्यासाठी अनेक राजकीय मात्तब्बर आंदोलनाच्या मैदानात उतरले आहेत.

सुरजागड पहाडी परिसरात माडीया गोंड आदिम जमातींचे व इतर आदिवासी जमातीचे श्रध्दास्थान ठाकूरदेव व दमकोंडवाही येथे तल्लोरमुत्ते, माराई सेडो व बंडापेनाचे पवित्र डोंगर-पहाड व जंगल आहे. सोबतच इतर धार्मिक पुजास्थाने असतांना, शासन व कंपन्यांकडून कोणतीही खातरजमा न करता सदर ठिकाणी लोह उत्खननाची व पुर्वेक्षणाची मंजूरी दिल्या गेली असा आरोप ग्रामसभेकडून केला जात आहे.

सरकारने तेथील देव व देवांचे पवित्र डोंगर-पहाड व जंगल खदानी करीता विकल्याची ओरड केली जात आहे.सुरजागड येथील खाणीत एकाच वेळी वर्ग २ चे एस.एम.ई.- ६६२८ किलो, कास्ट बुस्टर – १३३ किलो आणि वर्ग ६ चे इलेक्ट्रॉनिक डिटोनेटर्स ७५ नग स्फोटासाठी वापरण्यात येणार असल्याने स्फोटाचे हादरे आणि कंपन यामुळे किती परिघ अंतरात आवाज आणि इतर प्रकारचं प्रदुषण होणार अशी शंका आहे.

सुरजागड वूरीया हिल हा जवळपास २५ किलोमीटर असलेल्या पहाडावर खाण क्षेत्रात असून या क्षेत्रात आज रोजी बिबटे, अस्वल, निलगाय, हरिण, ससा, मोर इ. जंगली जनावरांचा मुक्त संचार व अधिवास आहे. तसेच हे क्षेत्र पूर्वीचे वाघांचे अधिवास क्षेत्र होते. (आताही अनेकदा वाघ दिसून येत असते) याव्यतिरिक्त अनेक प्रकारचे प्राणी आणि पक्षी तसेच दुर्मिळ वनस्पतींचे पोषक ठिकाण आहे. खाण आणि आता खाणीतील स्फोटामुळे या सर्वांचे वावर आणि अधिवास धोक्यात येणार आहे. एवढेच नव्हे तर अभयारण्यातील प्राणी आणि पक्षी यांनाही धोका निर्माण होईल,अशी भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे शासन व प्रशासनाकडे निवेदन देणाऱ्यांचा ओघ लागला आहे.

सुरजागडच्या आथिॕक व्यवहाराचे चक्र अहेरीतून….

सुरजागडच्या आथिॕक व्यवहाराचे चक्र अहेरी व आलापल्ली येथून सुरु असून यापूवी लोह खनिज उत्खननला विरोध करणारे आता बेरोजगारांच्या हाताला काम देण्याचे गोडवे गात असल्याने त्यांच्या बद्दल अहेरी उपविभागात शंका कुशंका व्यक्त केली जात आहे. लोह प्रकल्प सुरु करण्यासाठी सबंधीत कंपनीकडून प्रस्तावीत जमीनीवर कुठल्याही प्रकारच्या उपाययोजाना सुरु असल्याचे दिसून येत नाही. केवळ लोहखनिजाचीच वाहतूक बाहेर जिल्ह्यात केली जाणार आहे.त्यामुळे हजारो बेरोजगारांना काम मिळेल कसे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here