शासकीय आधारभूत शेतमाल खरेदीचे अधिकार कृषी उत्पन्न बाजार समिती ला द्या!
पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांना निवेदन;आ.कीर्तीकुमार भांगडिया यांची मागणी

तालुका प्रतिनीधी
चिमूर.
सन २०२०-२१ या हंगामासाठी शासकीय आधारभूत दराने शेतमाल खरेदीचे अधिकार चंद्रपूर जिल्हा औधोगिक सहकारी संस्था चंद्रपूर यांना दिले असताना त्यांच्याकडे सुविधा अभाव असल्याने कृषी उत्पन्न बाजार समिती चिमूर यांचेकडे आधारभूत शेतमाल केंद्र सुरू करण्यासाठी पणन मंत्री नामदार बाळासाहेब पाटील यांना दिलेल्या निवेदनातून आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी केली आहे .
सन २०२०-२१ या हंगामासाठी शासकीय आधारभूत दराने शेतमाल खरेदीचे अधिकार चंद्रपूर जिल्हा औधोगिक सहकारी संस्था चंद्रपूर यांना दिलेले आहे .परंतु या संस्थेकडे शेतमाल खरेदी करण्यासाठी कोणतेही गोदाम व अन्य सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे दरवर्षी अन्न धान्याची नुकसान होते कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकेयांची हक्काची बाजारपेठ असताना त्या ठिकाणी योग्य सुविधा आहे बहुतांश शेतकरी वर्ग नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे घेऊन सर्वप्रथम कृषी उत्पन्न बाजार समिती कडे येतात .समितीत आवश्यक पूर्ण कर्मचारी असल्याने त्यांची कामे वेळेतच होत असते .
परंतु मागील वर्षी शेतकऱ्यांनी संपूर्ण कागदपत्रे चंद्रपूर जिल्हा औधोगिक सहकारी संस्थेकडे दिल्यानंतरही वेळेत नोंदणी अभावी शेतकऱ्यांना आधारभूत किमतीचा लाभ मिळण्यासाठी विलंब झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या.
शासकीय आधारभूत दराचा फायदा अधिकाअधिक शेतकऱ्यांना तात्काळ होण्यास तालुक्यातील शेतकऱ्यांसह खरेदी केलेली धान्य साठवणुकीची सर्व सुविधा संपूर्ण आवश्यक यंत्रणा व कर्मचारी वर्ग उपलब्ध असल्याने कृषी उत्पन्न बाजार समिती ने खरेदी करण्याचे अधिकार मिळण्यासाठी ठराव सहित प्रस्ताव सादर केले आहे .
शासकीय आधारभूत दराने खरेदीची एजन्सी कृउबास चिमूर यास मिळण्यासाठी आवश्यक प्रस्ताव जिल्हा पणन अधिकारी चंद्रपूर यांच्या मार्फतीने व्यवस्थापक पणन महासंघ मुंबई यांचेडे सादर करण्यात आलेला आहे. परंतु दि महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन द्वारा दि १९ ऑक्टोबर २० अटी शर्तीनुसार नामंजूर केल्याचे निदर्शनास आले .
शेतकऱ्यांचा शेतमाल विक्रीस तयार असताना अधाप ही कृषी उत्पन्न बाजार समिती ला अधिकार प्राप्त न झाल्याने शेतकरी चिंतातुर झालेला आहे . शासकीय आधारभूत दराने शेतमाल खरेदीचे अधिकार चंद्रपूर जिल्हा औधोगिक सहकारी संस्था चंद्रपूर ऐवजी कृषी उत्पन्न बाजार समिती चिमूर ला अधिकार देण्याची मागणी आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी पणन मंत्री नामदार बाळासाहेब पाटील यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.