नवरात्रोत्सव अगदी साध्या पद्धतीने साजरा करा!
चामोर्शीत २१ शारदा मंडळानीच घेतली फक्त परवानगी

सुखसागर झाडे
चामोर्शी पोलीस स्टेशन अंतर्गत एकुण ८७ गावे येतात. यातील बहुतांश गावात दुर्गा व शारदा देवी चे प्रतिष्ठापना केली आहे. त्यापैकी २१ मंडळानीच पोलीस स्टेशन कडून रितसर परवानगी घेतली आहे.
परवानगी घेतलेल्या मंडळामध्ये नवयुवक दुर्गा मंडळ मूरखळा, सार्वजनिक महालक्ष्मी शारदा मंडळ वालसरा, जय शारदा महिला मंडळ लखमापूर बोरी, तळोधी शारदा मंडळ. तेलंग मोहल्ला चामोर्शी, जय महा भवानी शारदा महीला मंडळ वगैरे अशा मंडळाने च परवानगी घेतली आहे.
दुर्गादेवी/शारदा देवी उत्सवादरम्यान मंडळामार्फत आयोजित घेतले जाणारे सर्व कार्यक्रम व विसर्जन हे अत्यंत साध्या पद्धतीने करावेत असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, पोलीस हवालदार संदीप भिवनकार यांनी केले आहे.