भगवान बुद्धाच्या मूर्तीची विटंबना करणाऱ्या समाजकंटकावर तत्काळ कारवाई करा

0
233

भगवान बुद्धाच्या मूर्तीची विटंबना करणाऱ्या समाजकंटकावर तत्काळ कारवाई करा

प्रयास सखी मंच घुग्घुसच्या अध्यक्षा किरण बोढे यांची मागणी

 

घुग्घुस :येथील प्रयास सखी मंचच्या वतीने मंगळवार, २ जानेवारी रोजी भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीची विटंबना करणाऱ्या समाजकंटकावर तत्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

भद्रावती शहरातील ऐतिहासिक बुद्ध लेणी टेकडीवरील भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीची अज्ञात समाजकंटकांकडून विटंबना केल्याची घटना सोमवार, १ जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली.

या प्रकरणातील दोषींना तत्काळ अटक मागणी प्रयास सखी मंच घुग्घुसच्या अध्यक्षा किरण बोढे यांनी केली आहे.

या ऐतिहासिक बुद्ध लेणी टेकडीवर भगवान गौतम बुद्धाची मूर्ती होती. या मूर्तीची विटंबना झाल्याची घटना उघडकीस आली. अशा प्रकारच्या घटनांमुळे जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणात तत्काळ कारवाई करून दोषींना अटक करने आवश्यक आहे.

प्रयास सखी मंच घुग्घुसच्या अध्यक्षा किरण बोढे यांनी शिष्टमंडळासह ठाणेदार आसिफराजा शेख यांची पोलिस ठाण्यात भेट घेतली व चर्चा करून निवेदन दिले.

यावेळी प्रयास सखी मंच घुग्घुसच्या अध्यक्षा किरण बोढे, सुषमा सावे, अमीना बेगम, पुष्पा रामटेके, माधुरी चोखांद्रे, सुधा उरकुडे, गुलशन बानो, जकरून बानो शेख, सुनीता घिवे, शारदा झाडे, वैशाली भालशंकर, शारदा फुलझले, छाया पाटील, प्रीती बोत्रा, विमल इंगोले, शुभश्री किन्हेकर, शोभा माकोडे, आरती पुसाटे, नेहा कुम्मरवार, खुशबू मेश्राम, स्वाती गंगाधरे, वैष्णवी मडावी, कुमुदिनी हनुमंते, पायल वाडगुरे व मोठया संख्येत महिला उपस्थित होत्या.•

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here