चंद्रपूर जिल्ह्यात आम आदमी पक्षाची संवाद सभा अभियान

0
229

चंद्रपूर जिल्ह्यात आम आदमी पक्षाची संवाद सभा अभियान

चंद्रपूर, 1 जाने. 2024 : येत्या 3 जानेवारी 2024 पासून जिल्ह्यातील प्रत्येक जिल्हा परिषद सर्कलच्या गावामध्ये आम आदमी पार्टीची संवाद सभा घेण्यात येईल. ही सभा जिल्हा परिषद सर्कलच्या नावावरती असणाऱ्या प्रमुख गावातील मुख्य चौकात व मोक्याच्या ठिकाणी घेण्यात येईल, अशी माहिती आम आदमी पक्षाच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी दिली.

या अभियानामार्फत स्थानीय शेती संबंधीच्या विषयांबद्दल शेतकऱ्या बरोबर संवाद साधण्यात येईल.या सभेत शेती संबंधित विषयांवर चर्चा होईल. सभेत तांदूळ, कापूस, सोयाबीन, तूर, चना, ऊस सारख्या शेतमालाला योग्य भाव, पीक विमा प्रक्रिया सुरळीत करणे, जंगली जनावरांनी केलेले नुकसान व अतिवृष्टीने झालेले नुकसान याची भरपाई, सिंचन व्यवस्था, कर्जमाफी, 24 तास शेती करीत वीज देणे या विषयांवर चर्चा होईल. या अभियानाची सुरुवात 3 जानेवारी रोजी होणार आहे.

या अभियानात खालील विषयांचा समावेश करण्यात आला आहे:

* तांदूळ, कापूस, सोयाबीन, तूर, चना, ऊस सारख्या शेतमालाला योग्य भाव. स्वामीनाथन आयोग लागू करून उत्तपादनन खर्चच्या दुप्पट भाव देण्यात यावे.
* पीक विमा प्रक्रिया सुरळीत करण्यात यावी त्याचे पैसे त्वरित देण्यात यावे.
* जंगली जनावरांनी केलेले नुकसान व अतिवृष्टीने झालेले नुकसान याची भरपाई योग्य मोलाची व योग्य वेळी करण्यात यावी. त्याचबरोबर सरकारकडून नुकसान भरपाईची प्रक्रिया सुरळीत करण्यात यावी.
* विदर्भातील निम्म्याहून अधिक भाग हा कोरडवाहू आहे. स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर देखील योग्य ती सिंचन व्यवस्था बनलेली नाही. विधर्भातील 105 सिंचनाचे प्रोजेक्ट त्वरित पूर्ण करण्यात यावे.
* कर्जमाफी करण्यात यावी, सरकार ने सरसकट पूर्ण सातबारा कोरा करावा.
* 24 तास शेती करीत वीज देण्यात यावी.

चंद्रपूर जिल्ह्यात या अभियानात खालील गावांमध्ये सभा होणार आहे:

* दुर्गापूर
* बोर्डा – जूनोना
* ऊर्जानगर
* पडोली – ताडाळी
* घुघुस
* नाकोडा – मारडा

बल्लारपूर तालुका
* विसापूर – बामणी
* पळसगाव – कोठारी

भद्रावती तालुका
* चंदनखेडा – मुधोली
* कोकेवाडा – नंदोरी
* पाटाळा – माजरी
* कोठा – घोडपेठ

ब्रम्हपुरी
* नान्होरी – नवरगाव
* पिंपळगाव – मालडोंगरी
* खेड मक्ता – चावघान
* गांगलवाडी – मेंडकी
* आवडगाव – मुंडजा

राजुरा
* गोवरी – सास्ती
* चुनाळा – विरुर
* आर्वी – पाचगाव
* देवाडा – डोंगरगाव

जिवती
* पाटण – शेनगाव
* खडकीरायपूर – पुडियाल मोहदा

कोरपना
* कोडासी पुंज – भोयगाव
* ऊपरवाही – नांदा
* येरगव्हान – परसोडा

गोडपिपरी
* करंजी – खराडपेठ
* विठ्ठलवाडा – तळोधी
* तोहगाव – धाबा

पोंभूर्णा
* देवाडा खुर्द – केमारा
* चिंतलधाबा – घोसरी

मुल
* राजोली – मारोडा
* जुनासुरला – बेंबाळ
* केलझळ – चींचाळा

सिंदेवाही
* नवरगाव – पळसगाव जाट
* गुंजेवाही – लोन वाही
* रत्नापूर – शिवनी
* मोहाडी नले – वासेरा

नागभिड
* कानपा – मोशी
* पारडी – बाळापुर गुंज
* गोविंदपुर तळोधी बाळापुर
* गिरगाव – वाढोना

चिमूर
* भिसी – आंबोली
* शंकरपुर – डोमा
* सिरपुर – नेरी
* मुरपार तुकुम – खडसंगी
* मसाळ बुंज – मदनापुर

वरोरा
* खांबाडा – चिकणी
* टेंबुर्डा – अंबामाक्ता
* नागरी – माढेली
* चुरुरखुटी – सलोरी
* शेगाव बूंज – बोर्डा

या अभियानातून आम आदमी पार्टी विदर्भातील शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेईल आणि त्यावर उपाययोजना करण्याचा प्रयत्न करेल.

या अभियानात आम आदमी पक्षाच्या जिल्हा स्तरावरील नेते, कार्यकर्ते व सदस्य सहभागी होतील. या अभियानातून आम आदमी पक्ष शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यास व त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here