रोटरी क्लबच्या आरोग्य तपासणी शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद

0
221

रोटरी क्लबच्या आरोग्य तपासणी शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद

राजुरा : रोटरी क्लब राजुरा, केअर क्लीनिकल लॅब, राजुरा तालुका पत्रकार संघ व लोकमत सखी मंच राजुरा यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबिराला राजुरा शहरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नवीन वर्षाचे स्वागत आरोग्याची काळजी घेत करताना या शिबिरामध्ये 81 नागरिकांनी आपली आरोग्य तपासणी केली. हे शिबिर राजुरा शहरातील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय येथे घेण्यात आले.

यात एल एफ टी, के एफ टी, सी बी सी, थायरॉईड, ब्लड शुगर फास्टिंग, लिपीड प्रोफाइल इत्यादी तपासण्या समाविष्ट असलेल्या चाचण्या फक्त 999 रुपये घेऊन करण्यात आल्या.

या तपासणी शिबिरामध्ये राजुरा तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष मसुद अहमद, आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त बाबुभाई शेख, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष संदीप जैन, चांडक कृषी केंद्राचे संचालक राजेंद्र चांडक, आमदार सुभाषभाऊ धोटे यांचे स्विय सहाय्यक हेमंत झाडे यांच्यासहित राजुरा शहरातील गणमान्य नागरिकांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली.

केअर लेबरटोरी चे संचालक अहमद शेख,लॅब टेक.अदनान शेख, लॅब टेक.नंदिनी वर्मा, लॅब टेक. अंकिता महाडोळे, लॅब टेक. रीना लाटेलवार, रोटरी क्लब चे अध्यक्ष कमल बजाज, उपाध्यक्ष आनंद चांडक, किरण ढुमने, सुबोध डाहुले, नवल झंवर आदींची उपस्थिती होती.

या तपासणी शिबिराच्या यशस्वी ते करिता केअर क्लिनिक लॅब, तालुका पत्रकार संघ व रोटरी क्लब राजूराच्या कमल बजाज, नवल झंवर, किरण ढुमणे, अमोल कोंडावार, अजहर शेख, ऋषभ गोठी, निखिल चांडक, नितेश गिरडकर, किशोर हिंगाणे, सुबोध डाहुले यांनी मोलाचे परिश्रम केले.

लोकमत सखी मंच, रोटरी क्लब राजुरा, ग्रामीण पत्रकार संघ राजुरा, केअर क्लिनिकल लॅब राजुरा यांच्या संयुक्त विद्यमाने 81 लोकांच्या विविध रक्ताच्या चाचण्या यशस्वीरीत्या पार पाडून सरत्या वर्षाला बाय बाय करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here