बाल गृहातील विद्यार्थी घेत आहे गप्पागोष्टी या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद

0
769

बाल गृहातील विद्यार्थी घेत आहे गप्पागोष्टी या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद

(गप्पा-गोष्टी द्वारे विद्यार्थ्यांसोबत थेट संवाद, बालगृहातील विद्यार्थ्यांचा देखील यात समावेश)

हिंगणघाट (वर्धा):- अनंता वायसे तालुका प्रतिनिधी

कोरोना काळामध्ये शाळा बंद आहेत, अश्या परिस्थितीत मुलांचा अभ्यास सुरू राहावा म्हणून शाळा स्तरावर,शासन स्तरावर विविध कार्यक्रमाचे आयोजन केल्या जात आहे. आज मुलं घरी राहून कंटाळली आहेत. मुलांमध्ये पठारावस्था आलेली आहे. मुलांचे फार मोठ्या प्रमाणात शैक्षणिकच नव्हे तर इतरही बरेच नुकसान झालेले आहे. कारण शाळांमधून मुलांचा सर्वांगीण विकास साधला जात असतो. या सर्व बाबींचा विचार करून सन्माननीय डॉक्टर मंगेश घोगरे प्राचार्य जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था वर्धा यांच्या प्रेरणेने सन्माननीय अशोक कोडापे गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती हिंगणघाट यांच्या मार्गदर्शनाखाली कुमारी संगीता पेठे (गडवार ) विषय साधन व्यक्ती पंचायत समिती हिंगणघाट यांनी मुलांचे शारीरिक, मानसिक व सामाजिक आरोग्य सुदृढ राहावे म्हणून झूम मीटिंग द्वारे मुलांशी थेट संवाद साधण्याचा यशस्वी प्रयत्न गप्पागोष्टी कार्यक्रमाच्या माध्यमातून सुरू केलेला आहे. आज पर्यंत “गप्पा- गोष्टी ” च्या 44 सत्रांचे यशस्वी आयोजन करण्यात आलेले आहे. जिल्हा परिषदेच्या बारा शाळा कार्यक्रमांमध्ये सहभागी झालेल्या आहेत. या कार्यक्रमामध्ये मुलांना सादरीकरणाची संधी दिल्या जात असल्यामुळे मुलांकरिता व्यासपीठ मिळवून दिलेले आहे. क्षकांद्वारे विविध विषय मनोरंजनात्मक पद्धतीने हाताळले जातात. तसेच या कार्यक्रमामध्ये सादर केलेल्या ॲक्टिविटी चा व्हिडिओ तयार करून युट्युब वर अपलोड केला जातो जेणेकरून ऑनलाइन कार्यक्रमाला जे विद्यार्थी उपस्थित राहू शकले नाही त्यांना याचा लाभ घेता यावा.
* थेट संवाद *
“गप्पा – गोष्टी” मध्ये जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सन्माननीय माधुरी भोयर मॅडम यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून बाल संरक्षण गृहाविषयी माहिती दिली. तसेच वर्धा येथील बाल संरक्षण गुहांमध्ये 85 विद्यार्थी असून त्यांना देखील गप्पागोष्टी या कार्यक्रमाचा लाभ मिळवून दिला. बालगृहातील विद्यार्थी उत्साहाने “गप्पा – गोष्टी” कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटत आहे. डॉ.संगीता महाजन , अधिव्याख्याता RAA नाशिक यांनी विद्यार्थ्यांशी दिलखुलास संवाद साधला. मुलांमधील पोलीस डिपार्टमेंट विषयी भिती कमी होऊन आदर निर्माण व्हावा म्हणून पोलीस कॉन्स्टेबल शामली गेडाम यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. गटशिक्षणाधिकारी अशोक कोडापे व गट समन्वयक अरविंद राठोड सर यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज केले.
विद्यार्थ्यांना मनोरंजनात्मक पद्धतीने अध्ययन अनुभव देण्याकरिता विविध विषयांवरील सत्राचे सादरीकरण “गप्पा – गोष्टी” ची संपूर्ण टीम उत्साहाने व तन्मयतेने मिळून मिसळून करत असते.
“गप्पा – गोष्टी” कार्यक्रमास डाएट प्राचार्य डॉ. मंगेश घोगरे सर यांचे नियमित प्रोत्साहन व मार्गदर्शन प्राप्त होत असते. तसेच तालुका संपर्क अधिकारी मधुमती सांगळे मॅडम अधिव्याख्याता डाएट वर्धा, श्री अशोक कोडापे गटशिक्षणाधिकारी, अरविंद राठोड गटसमन्वयक हिंगणघाट, मा. श्री सुभाष टाकळे,विस्तार अधिकारी यांचे नियमित मार्गदर्शन व प्रेरणा या कार्यक्रमाला मिळत असते. तर .श्री यादवराव तुराळे .सौ विद्या बोभाटे कें. प्र. कार्यक्रमाला उपस्थित राहून मार्गदर्शन करीत असतात .कु. संगीता पेठे (गडवार), सौ. शारदा डुंबरे, कु.राजेश्री दहीलकर, सौ वंदना चाफले,सौ माया चाफले, कु.सोनू गजभिये, श्री रविंद्र सुपारे,श्री उमेश शिंगोटे, सौ सुधा देवतारे, सौ माधुरी विहिरकर , सौ वैशाली लांजेवार, सौ आशा बेले सर्वo शिक्षक मंडळी अथक प्रयत्न करून कार्यक्रमांमध्ये सादरीकरण करत असतात तसेच विषय साधन व्यक्ती सौ. अनिता ऊगे, कु. विद्या वाघमारे, कु. माधुरी राऊत, कु.ज्ञानाई गडवार यांचे कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता सहकार्य सतत लाभते. तर जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी तसेच इतरही शाळांमधील विद्यार्थी त्यांना आवडणाऱ्या विषयाचे सादरीकरण करून कार्यक्रमाच्या यशस्वी वाटचालीस सहकार्य करीत आहेत. आज पर्यंत 26 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सादरीकरणामध्ये सहभाग नोंदविला आहे.
“गप्पा- गोष्टी” कार्यक्रमाने अनेक शाळांना जोडून विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिल्यामुळे जिल्हास्तरावरून सर्वत्र कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here