अतुल शिंदे यांची जितेंद्र आव्हाड युवा मंचच्या मराठवाडा विभागाच्या अध्यक्षपदी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते नियुक्ती!

0
635

अतुल शिंदे यांची जितेंद्र आव्हाड युवा मंचच्या मराठवाडा विभागाच्या अध्यक्षपदी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते नियुक्ती!

पुरोगामी विचारांचा प्रचार व प्रसार करून शिव शाहू फुले आंबेडकर यांचे कार्य जनसामान्यांपर्यत पोहोचवण्यासाठी अहोरात्र कष्ट घेणारे आष्टी तालुक्याचे भूमिपुत्र अतुल शिंदे

आष्टी : बहुजन महामानवांच्या विचारांचे वारसदार गृहनिर्माण मंत्री जितेंद्र जी आव्हाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व जितेंद्र आव्हाड युवामंच या सामाजिक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद भाऊ सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुरोगामी विचारांचा प्रचार व प्रसार करून शिव, शाहू, फुले आंबेडकर यांचे कार्य जनसामान्यांपर्यत पोहोचवण्यासाठी अहोरात्र कष्ट घेणारे आष्टी तालुक्याचे भूमिपुत्र अतुल शिंदे यांची जितेंद्र आव्हाड युवा मंचच्या मराठवाडा विभागाच्या अध्यक्षपदी निवड गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड साहेब यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र ये ए 3 या जितेंद्र आव्हाड साहेब यांच्या शासकीय बंगल्यावर झालेल्या बैठकीत देण्यात आले.

 

यावेळी प्रदेशाध्यक्ष प्रमोद सरोदे, नकुल पाटील तसेच तात्यासाहेब आशोक जेवे, राजू कुरेशी, अब्बास तांबोळी, मिलिंद भालेराव, धनु भालेराव, शेख आबरार व नांदेड, उस्मानाबाद, औरंगाबाद, लातूर या जिल्ह्यांचे युवा मंचचे जिल्हाध्यक्ष उपस्थित होते. यावेळी अतुल शिंदे यांनी जिल्हा अध्यक्ष पदाच्या कार्यकाळात केलेल्या कामाचा आढावा आदरणीय आव्हाड व प्रदेशाध्यक्ष प्रमोद सरोदे यांच्यासमोर मांडला.

 

अतुल शिंदे यांनी अनेक वेळा या संघटनेच्या माध्यमातून गोरगरीब लोकांना अन्नधान्य वाटप असेल किराणा सामानाच्या किटचे वाटप असेल किंवा कोरोना महामारीच्या काळामध्ये सर्वसामान्य लोकांना दवाखान्यात नेण्यापासून ते दवाखान्यातून सोडेपर्यंत या जिल्ह्यामध्ये सर्वसामान्य लोकांना खूप सहकार्य केले आहे. बहुतेक याची पोचपावती म्हणूनच त्यांची या संघटनेच्या मराठवाडा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल अतुल शिंदे यांचे आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय बाळासाहेब आजबे काका यांनी अभिनंदन केले.

 

तसेच सर्व पत्रकार, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अण्णासाहेब चौधरी, ओबीसी सेलचे राज्य उपाध्यक्ष डॉक्टर शिवाजीराव राऊत, काकासाहेब शिंदे, डॉक्टर नदीम शेख, नाजीम शेख, अशोक पोकळे, भाऊ घुले, संदीप भाऊ सुंबरे यांच्यासह अनेक बांधवांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या जिल्ह्यांमध्ये प्रत्येक पक्षाचा संघटनेचा कार्यकर्ता हा कुठल्या ना कुठल्या राज्यातील प्रमुख नेत्यांच्या संपर्कात आहे. तर अतुल शिंदे हे सुद्धा या जिल्ह्यातून जितेंद्र आव्हाड यांचे निकटवर्तीय समजले जातात. निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून हार्दिक अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here