अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

0
488

अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

बल्लारपूर, चंद्रपूर : प्रतिनिधी राज जुनघरे

कोठारी ते तोहोगाव मार्गावर बामणी,कुडेसावली दरम्यान अनोखा अपघात घडला. यात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. आणि मागे बसनारास किरकोळ मार बसला आहे. सविस्तर वृत्त असे की, गोंडपिपरी तालुक्यातील कुडेसावली येथील जिवंनदास शिवराम रायपुरे हा १४ जुलै च्या सायंकाळी ६.०० वाजताचे दरम्यान आपल्या दुचाकी वाहनाने कुडेसावली येथुन कोठारी कडे येत असता, समोरून येणाऱ्या बैलगाडीला जबर धडक दिली. यात जिवंनदास शिवराम रायपुरे वय ५५ वर्षे याचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीची धडक इतकी जबर होतीकी दुचाकीसह बैलगाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र दुचाकी वर मागे बसनारास किरकोळ मार लागला आहे. मृतकास शवविच्छेदनासाठी गोंडपिपरी येथील शवविच्छेदन गृहात हलविण्यात आले असून पुढील तपास कोठारी पोलिस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here