‘माता न तू वैरिणी’, त्या मृत अर्भकाची माता कोण?

0
670

‘माता न तू वैरिणी’, त्या मृत अर्भकाची माता कोण?

आशिष गजभिये
चिमूर

‘माता न तू वैरिणी’ अशी म्हण आहे. मात्र एका मातेने सात महिन्यांच्या भ्रूणाला जन्म देताच मारून फेकून दिल्याने ती GBआपल्या पोटच्या गोळय़ाची वैरीन कोण? याची चर्चा आहे. ही घटना चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात वॉर्ड क्र.-१ च्या शौचालयातील आहे.
गजबलेल्या आणि जिथे आरोग्य कर्मचारी स्टाफ तैनात असतो, अश्या वॉर्ड मधील रुग्णांना उपयोगाच्या शौचलयात ७ महिन्यांचे मृत भ्रुण ( बालिका) आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. ते बाळ जन्माला आल्यानंतर मारून टाकले काय? कुमारी मातेचे बाळ असावे?, अन्यथा कुमारी मातेचा अवैधरित्या गर्भपात केला गेला असावा? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या घटनेची माहिती मिळताच चिमूर पोलिस तपास करीत असून पोष्टमार्टम रिपोर्टची प्रतीक्षा व आणि बयान नोंदविणे सुरू आहे. दुसर्‍या दिवशीही मातेचा सुगावा लागला नसल्याने त्या बाळाच्या आईचा शोध लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांसामोर आहे.
उपजिल्हा रुग्णालयात मृत भ्रुण आढळून आल्याने खळबळ माजली असली तरी नेमके ते बाळ कोणाचे ? आणि शौचालयात का फेकण्यात आले? याचा अद्याप उलगडा झाला नाही. उपजिल्हा रुग्णालयात तर काही गैरप्रकार होत तर नसेल ना? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. वॉर्डातील कर्मचार्‍यांचे बयानही नोंदविन्यात आले आहे. चन्द्रपूर येथील तज्ञ डॉक्टरांच्या समक्ष शव विच्छेदनासाठी पाठविले होते. अहवाल प्राप्त न झाल्याने या घटने मागील रहस्य कायम आहे. नेमके पोलिस तपासात काय उघड होते यावर सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. संबंधित कर्मचारी-अधिकारी यांचे बयान नोंदविणे सुरू असले तरी पोस्टमॉर्टम रिपोर्ट यावर सर्व अवलंबून आहे. ते बाळ जिवंत होते की मृतावस्थेत जन्माला आले आणि कोणाचे याची माहिती रुग्णालयात असायला पाहिजे होती. मात्र याची कुठलीही नोंद नाही. जेव्हा सफाई कामगार शौचालय सफाईसाठी गेले असता प्रकार उघडकीस आला. त्यामुळे फिर्यादी राजेश सुब्बाराव शेट्टी या सफाई कामगाराच्या तक्रारीवरून अज्ञात इसमाविरुध्द चिमूर पोलिसांनी ३१८ भादंवि अन्वये गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरू आहे. दोन दिवानंतरही या मृत अर्भकाची माता कोण याचा शोध पोलिस लावू शकले नाहीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here