ओबीसी ना 52 टक्के आरक्षण मिळण्यासाठी सर्व ओबीसींना एकत्र येऊन लढा उभा करण्याची गरज

0
414

ओबीसी ना 52 टक्के आरक्षण मिळण्यासाठी सर्व ओबीसींना एकत्र येऊन लढा उभा करण्याची गरज

वंचित बहुजन आघाडी बल्लारपूर चे तालुका अध्यक्ष उमेश वाढई यांचे ओबीसी बांधवांना जाहीर आवाहन

 

 

बल्लारपूर/रोहन कळसकर : वंचित बहुजन आघाडी बल्लारपूर तालुका अध्यक्ष उमेश वाढई यांनी ews आरक्षण हे आर्थिक दुर्बल घटकांसाठी दिले असले तरी यातून आर्थिकदृष्ट्या मागास असणारे ओबीसी, एसी, एस्टी, यांना वघडणे अन्यायकारक आहे. एकीकडे केंद्रसरकारणी सर्वोच्च न्यायालयात ओबीसीचे आर्थिक,सामाजिक,राजकीय,शैक्षणिक, नोकरी मधले आकडे दिले नाही म्हणून ओबीसीचे राजकीय आरक्षण रद्द करण्याचा निर्णय दिला आणि दुसरीकडे ews मध्ये किती व्यक्ती येतात, त्यांची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय व नोकरी मधील आकडे केंद्र सरकारने दिले नसतानाही न्यायालयाने 10% आरक्षण लागू करणे दुर्देवी निवाडा आहे.तसेच 50% आरक्षणाचा वरती मागासवर्गीयांना आरक्षण देता येत नाही असा सुप्रीम कोर्टाचा निर्णय असतांनाही 50% ची मर्यादा शिथिल करून 10% उच्चवर्णीयांनसाठी लागू करणे म्हणजे आतापर्यंत ओबीसी ना 52% आरक्षणापासून वंचित ठेवून 27% आरक्षण च देणे हा आजचा घडीला आरक्षणातील सर्वात मोठा घोटाळा मनता येईल.

एकंदरीत ओबीसी ना घातलेली 27% ची मर्यादा अन्यायकारक असून EWS आरक्षणा विरोधात पुनर्विचार याचिका दाखल करण्याची व 52% आरक्षणासाठी ओबीसी नी एकत्र येवुन लढा उभा करण्याची गरज आहे. तसेच कांग्रेज,भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेज,शिवसेना या पक्षानी EWS आरक्षणाला समर्थक दिले असले तरी मागासवर्गीयांचा हितासाठी वंचित बहुजन आघाडी , डी म के यासारख्या पक्षानी विरोद्ध दर्शवला आहे हे ओबीसी बांधवांनी लक्षात घेने गरजेचे आहे. भविष्याचा विचार केला तर वंचित बहुजन आघाडी सोबत येणे गरजेचे आहे ,असे भावनिक आवाहन वंचित बहुजन आघाडी बल्लारपूर तालुका अध्यक्ष उमेश वाढई, यांनी ओबीसी बांधवांना केले आहे यावेळी सदस्य संदीप निरंजने, शहराध्यक्ष ओम रायपुरे, सिद्धार्थ शंभरकर, अतुल पावडे, पवणसिग कुशवाहा, अंकुश जिवणे हे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here