ज्येष्ठ नागरिक संघाच्या नवनिर्वाचीत सदस्यांनी घेतली आमदार किशोर जोरगेवार यांची भेट

0
436

ज्येष्ठ नागरिक संघाच्या नवनिर्वाचीत सदस्यांनी घेतली आमदार किशोर जोरगेवार यांची भेट

 

 

ज्येष्ठ नागरिक संघाच्या नवनिर्वाचित सदस्यांनी आज कार्यालयात आमदार किशोर जोरगेवार यांची भेट घेतली यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी सर्व सदस्यांच्या गळ्यात हार टाकुन त्यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्यात. तसेच यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी जेष्ठ नागरिकांचा आशीर्वाद घेतला.

यावेळी नवनिर्वाचीत सदस्यांपैकी चोकादास अलमस्त, वंसतराव आवारी, लक्ष्मन धोबे, मानीकराव गहोकर, पंधरीनाथ गोहोकार, तेजराम कापगते, वसंतराव मुसळे, चंपतराव नांदे, महादेव पिंपळकर, परशुराम तुंडलवार, शरद उरकुडे, यांच्यासह ज्येष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष विजय चंदावार आणि ज्येष्ठ नागरिकांची मोठ्या संख्येने आदिंची उपस्थिती होती.

ज्येष्ठ नागरिक संघाच्या पदाधिका-र्यांचा कार्यकाळ संपल्याने निवडणूका घेण्यात आल्या होत्या. या निवडणुकीचा निकाल जाहिर झाला आहे. दरम्यान आज ज्येष्ठ नागरिक संघाच्या नवनियुक्त सदस्यांनी आमदार किशोर जोरगेवार यांच्या कार्यालयात आ. जोरगेवार यांची भेट घेतली. यावेळी आ. जोरगेवार यांनी नवनिर्वाचित सदस्यांचे अभिनंदन करुन त्यांना शुभेच्छा दिल्यात. विचारांची अमुल्य ठेव असलेल्या ज्येष्ठ नागरिक संघाची गरज समाजाला आहे. आजवर या संघाच्या माध्यमातुन समाजाला दिशा देण्याचे काम झाले आहे. पुढेही ते सुरु राहतील अशी अपेक्षा यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली. लोकप्रतिनिधी म्हणुन शक्य ती मदत माझ्याकडून नेहमी होत राहिल असेही यावेळी आ. जोरगेवार म्हणाले. नवनियुक्त सदस्य ज्येष्ठ नागरिक संघाचे काम गतीशीलरित्या पूढे नेतील असा विश्वासही यावेळी त्यांनी बोलुन दाखवला. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे प्रसिध्दी प्रमुख नकुल वासमवार, करणसिंह बैस, गौरव जोरगेवार, सलिम शेख, आनंद रणशुर आदिंची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here