काँग्रेसचा दिग्गज नेता काळाच्या पडद्याआड !

0
872

काँग्रेसचा दिग्गज नेता काळाच्या पडद्याआड ! संजय मारकवारचे अपघाती निधन ! मूल तालुक्यात पसरली शाेककळा !सहज सुचल ग्रुपने वाहिली भावपूर्ण श्रध्दांजली !

किरण घाटे

चंद्रपुर:- संजू भाऊ या नावाने संपूर्ण मूल तालुक्यात परिचित असलेले राजगड या आदर्श गावचे मूळ निवासी , मूल संजय गांधी निराधार याेजनेचे नवनियुक्त अध्यक्ष
पंचायत समिती आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे भूतपूर्व सभापती तथा विद्यमान सदस्य, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष, माँ दुर्गा मंदीर विश्वस्थ मंडळाचे उपाध्यक्ष, मूल तालुका ओबीसी समन्वय समितीचे सल्लागार, मे .लक्ष्मी कन्स्ट्रक्शन कंपनीचे संचालक, सुपरिचीत कंञाटदार या शिवाय विविध सामाजिक, धार्मिक, सहकार, शैक्षणिक संस्थाचे पदाधिकारी तथा जिव्हाळ्याचे संबंध असणारे संजय मारकवार यांचे काल रविवार दि.६डिसेंबरला एका रस्ता अपघातात निधन झाले .काल ते सावली वरुन दुचाकी वाहनाने आपल्या स्वगावी परत येत असतांना रस्त्यावरील खड्ड्यात दुचाकी गेलेमुळे हा अपघात झाला असल्याची नागरिकात चर्चा आहे .

५३वर्षिय संजय मारकवार यांना सदरहु अपघातात डाेक्याला गंभीर दुखापत झाली. तातडीने त्यांना सावली येथे उपचारार्थ दाखल करण्यांत आले .तेथील प्राथमिक उपचार आटाेपल्या नंतर लगेच त्यांना चंद्रपूरला हलविण्यांत आले .डाँ .मंडळीने त्यांचेवर उपचार देखिल केले पण अखेर त्यांचे अथक प्रयत्नाला यश आले नाही . शेवटी संजय मारकवार यांची प्राणज्याेत शासकीय रुग्णालयातच मालवली .

या दुखद घटनेचे व्रूत्त कानी पडताच अख्ख्या मूल तालुक्यासह चंद्रपूर जिल्ह्यात शाेककळा पसरली आहे. स्व .संजय मारकवार यांना महाराष्ट्रातील सहज सुचल ग्रुपच्या मुख्य संयाेजिका मेघा धाेटे , सहसंयाेजिका मायाताई काेसरे , प्रभा अगडे, स्मिता बांडगे , विजया तत्वादी , नयना झाडे , ललिता फुलझेले , रुपाली संताेषवार , वंदना आगरकाठे , रसिका ढाेणे , प्रतिभा चट्टे , कविता चाफले , पत्रकार अमर राठाेड , शंकर चव्हाण , रामदास हेमके , संजय वरघने , नितिन पाटील , नितिन लाेणारे , गजानन बुटके , संदीप बाेबाटे, मनाेज वालदे , दशरथ वाकुडकर , संजय येनुरकर , राकेश रत्नावार, लता निंदेकर , प्रतिमा नंदेश्वर , पूनम रामटेके , अनिल कामडी , हसन वाढई ,वंदना हातगांवकर , भाग्यश्री हांडे. संदीप अगडे , दत्ता समर्थ , प्रवीण बाेबाटे , गणेश खाेब्रागडे , शुभम रत्नावार , आदिनी भावपूर्ण श्रध्दांजली अर्पित केली आहे .संजय मारकवार यांचे जाण्याने आपण आज एक दिलदार मित्र गमावला अश्या शब्दात घनश्याम येनुरकर यांनी आपली शाेकसंवेदना व्यक्त केली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here