संपूर्ण बल्लारपूर शहरामध्ये सीसीटिव्ही कैमरे लावणे गरजेचे

0
489

संपूर्ण बल्लारपूर शहरामध्ये सीसीटिव्ही कैमरे लावणे गरजेचे

विवेकानंद वार्ड झाशी राणी चौकात सीसीटीव्ही कैमेरे लावण्याची मागणी अद्यापही अपुर्ण – सामाजिक कार्यकर्ते रोहन कळसकर

माजी नगरसेवकांचे कळसकर यांना उध्दटपणाने रिप्लाय

“पोलीस मित्र बोलने से नही होता कैमेरे तुम लगवा लो नगर परिषद मेनटनेंस करेगी” – माजी नगरसेवक अरूण वाघमारे

मग या शहरात लागलेले सीसीटिव्ही कैमेरे गेले कुठे❓

नगरसेवक जर असे बोलत असेल तर आम जनता जाणार तरी कुठे❓

 

 

बल्लारपूर – संपूर्ण बल्लारपूर शहरात महाराष्ट्र शासना च्या माध्यमातून सीसीटिव्ही कैमेरे लावण्यात आले होते. मात्र स्थानिक प्रशासनाच्या निष्काळजी पणा मुळे अनेक सीसीटिव्ही कैमेरे खराब झाले तर काही चोरी गेले. स्थानिक प्रशासना कडुन मेनटनेंस न झाल्याने शहरातील अनेक सीसीटिव्ही कैमेरे लुप्त झालीत तर अनेक वर्षा पासून बल्लारपूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते व दैनिक सुवर्ण महाराष्ट्र चे बल्लारपूर तालुका प्रतिनिधी तर बल्लारपूर पोलीस स्टेशन चे पोलीस मित्र रोहन कळसकर हे झाशी राणी चौक येथे सीसीटिव्ही कैमेरे लावण्यासाठी वारंवार मागणी करत आहेत. त्यांनी या महाराष्ट्र वन मंत्री सुधिर मुनगंटीवार, खासदार बाळुभाऊ धानोरकर, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री मंत्री हंसराज अहिर यांना निवेदना द्वारे मागणी केली आहे. मात्र आता पर्यंत कुठल्याही प्रकारे यावर तोडगा निघाला नाही आणि सीसीटिव्ही कैमेरे सुध्दा लागलेले नाही.

या बाबत प्रभाग क्रमांक 03 च्या व्हाट्सऍप गृप वर कळसकर यांनी आपली भावना व्यक्त केली असता प्रभागाचे माजी नगरसेवक वाघमारे यांनी कळसकर यांना उध्दटपणाने रिप्लाय दिले आहे. विषेश म्हणजे कळसकर यांच्या मेसेज मध्ये कुणाच्या ही नावाचा उल्लेख नसताना माजी नगरसेवक अरुण वाघमारे यांनी दिलेल्या उध्दट रिप्लाय मुळे माजी नगरसेवक यांना असे बोलने अशोभनीय आहे. आणि नगरसेवक जर असे बोलत असणार तर आम जनता जाणार तरी कुणा कडे अशी भावना सामाजिक कार्यकर्ते व दैनिक सुवर्ण महाराष्ट्र चे तालुका प्रतिनिधी रोहन कळसकर यांनी व्यक्त केली आहे.

रोहन कळसकर यांनी केलेला व्हाट्सएप मेसेज

आम्ही गेल्या पाच वर्षां पासून तर आतापर्यंत अनेक वेळा नगरसेवक ते माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री यांच्या पर्यंत विवेकानंद वार्ड झाशी राणी चौक येथे सीसीटिव्ही कैमेरे बसविण्या साठी वांरवार निवेदन सादर केले आहे. परंतु या वर आतापर्यंत कुणाचेही लक्ष दिसुन येत नाही आहे. याचे नेमके मुख्य कारण काय❓

या वर माजी नगरसेवक अरुण वाघमारे यांचा रिप्लाय

पोलीस मित्र बोलने से नही होता. पोलीस स्टेशन के अंडर मै आता है. वह तुम लगवा नगर परिषद मेनटनेंस करेगा. बल्लारपूर मै कहा कैमेरे लगाकर है बताओ 3 बेस्ट लगाए है वो निकालो बोल रहे है, तो सीसीटिव्ही कैमेरे क्या करोगें?

मेरा काम और मेरा व्यवहार गृप को नही पता तो मुझे गृप से बाहर निकाल दो

एका माजी नगरसेवकांना असे उत्तर देणे कितपत योग्य❓

पोलीस मित्र हो लगवा पोलीस मित्र बोलने से नही होता तर मग नगरसेवक कोणत्या कामा करिता जेव्हा निवडणूकीचा रिंगणात जेव्हा हे उभे असतात तेव्हा हे सभ्यपणे अपेक्षेने वागतात आणि निवडून येताच यांचे रंग का बदलतात ❓

बल्लारपूर शहरातील झाशी राणी चौकात नव्हे तर संपूर्ण बल्लारपूर शहरात सीसीटीव्ही कैमेरे लावणे गरजेचे आहे. चोरी, गुन्हेगारी व इतर प्रकारच्या घटनेवर, अशा सर्व घटनांवर आळा घालून संपूर्ण बल्लारपूर शहर निगराणी सीसीटिव्ही कैमेरे च्या निगराणीत असणे अत्यंत गरजेचे आहे. तर यावर प्रशासन कधी उपाययोजना करेल❓कधी शहर ‘सीसीटिव्ही’ मय होईल❓यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here