पोंभूर्णा ३३ के.व्हि.अंतर्गत वारंवार खंडीत होणारा विजपूरवठा त्वरीत सुरळीत करा-मनसे

0
372

पोंभूर्णा ३३ के.व्हि.अंतर्गत वारंवार खंडीत होणारा विजपूरवठा त्वरीत सुरळीत करा-मनसे

पोंभूर्णा तालूक्यात मागील अनेक दिवसांपासून रोज २० ते २५ वेळा विजपूरवठा खंडित होत असून यामूळे समस्त जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे तसेच विद्याथ्यांना आनलाईन शिक्षणात अडथळा निर्माण होत आहे पाण्याविना शेतकरी त्रस्त आहे या सततच्या खंडीत विजपूरवठ्यामूळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे तेव्हा वारंवार खंडीत होणारा विजपूरवठा त्वरीत सुरळीत करा अन्यथा मनसेकडून आक्रमक आंदोलन केल्या जाईल हे निवेदनाच्या माध्यमातून कनिष्ट अभियंता विद्यूत पूरवठा कार्यालय पोंभूर्णा यांना मनसेचे जिल्हासचिव (बल्लारपूर विधानसभा)किशोरभाऊ मडगुलवार यांच्या प्रमुख उपस्थीतीत तालूका शाखा पोंभूर्णा यांच्या वतीने देन्यात आले विद्युत कार्यालयाला ७ दिवसाचे कालावधी दिली असून ७ दिवसाचे आत या समस्येचा निराकारन न झाल्यास मनसे आक्रमक आंदोलन करणार असा ईशारा देन्यात आला यावेळेस निवेदन देतांना मनसेचे जिल्हासचिव (बल्लारपूर विधानसभा) किशोरभाऊ मडगुलवार,मनसेचे पोंभूर्णा तालूकाअध्यक्ष आकाश तिरूपतीवार,मनसेचे पोंभूर्णा तालूकासचिव अमोल ढोले,मनविसे पोंभूर्णा तालूकाअध्यक्ष आशिष नैताम,मनसेचे रुग्नमित्र प्रविण शेवते,कौशल चिचघरे,तबरेतज कुरेशी,देवा मानकर आदि मनसैनीक उपस्थीत होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here