मुळा नदीवरील बहुचर्चित धरण पिंपळगाव खांड ओव्हर फ्लो..

0
938

मुळा नदीवरील बहुचर्चित धरण पिंपळगाव खांड ओव्हर फ्लो..

 

प्रतिनिधी/ ज्ञानेश्वर गायकर

अहमदनगर/संगमनेर :- अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील सह्याद्री च्या घाटमाथ्यावर असलेले , अकोले व संगमनेर तालुक्यातील दक्षिण भागात वरदान ठरलेले पिंपळगाव खांड धरण काल संध्याकाळी पूर्ण क्षमतेने भरले असून मुळा धरणात आता पाण्याची आवक लवकरच सुरू होणार आहे.

 

मुळा नदीवरील लघु पाटबंधारे अंतर्गत पिंपळगाव खांड प्रकल्पाचा पाणीसाठा ६००.०० दलघफू आहे.

ओव्हरफ्लो विसर्ग साधारणत: १५०-२०० क्युसेक्स ने सध्या सुरू आहे. पावसाने पुन्हा एकदा हुलकावणी दिली असून , मुळा नदीचा हा विसर्ग दक्षिण अकोले व संगमनेर तालुक्यातील,तर उत्तर पारनेर , व राहुरी तालुक्यातील नदी काठच्या भागातील शेतकरी यांना मोठा दिलासा देऊन जाणार आहे. अकोले तालुक्यातील कोतूळ, बोरी, वाघापूर, लिंगदेव, लहीत, चास, पिंपलदरी तर संगमनेर तालुक्यातील कोठे, घारगाव , जांबूत, साकुर विभागात पेरणी झाली असून, मात्र पावसाने दडी मारल्यामुळे पिकांना नदीचे पाणी वरदान ठरणार आहे.

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी या धरणाची निर्मिती लोकनेते सीताराम पाटील गायकर व तत्कालीन मंत्री मधुकर पिचड यांच्या आग्रस्तव दोन वर्षात ,पाण्याचे योग्य ते अकाउंट करून केली आहे. हे धरण अगस्ती सहकारी साखर कारखाना व भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना यांना वरदान ठरले असून, ऊस पिका बरोबर या भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात फळबाग व भाजीपाला उत्पन्न घेत आहे. धरण भरल्याने शेतकरी वर्गात आनंद व्यक्त केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here