घरकुल विभागाचे अभियंता चव्हाण यांच्याकडून गरीब घरकुल लाभार्थ्यांचे शोषण

0
1010

घरकुल विभागाचे अभियंता चव्हाण यांच्याकडून गरीब घरकुल लाभार्थ्यांचे शोषण

गोंडपिपरी/चंद्रपूर (सूरज माडुरवार)

गोंडपिपरी पंचायत समितीत कार्यरत घरकुल विभागाचे अभियंता चव्हाण यांची कार्यपद्धती गरीब घरकुल लाभार्थ्यांच्या हिताची नसून अनेक लाभार्थ्यांचे शोषण करण्याचे काम सुरू असून त्यांच्याकडील कार्यभार काढण्यात यावा अशी मागणी अनुसूचित जाती विभाग काँग्रेसने केली आहे.
घरकुल लाभार्थी कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर एक दोन कागदपत्र गहाळ करून तीच कागदपत्र अर्थकारणासाठी चव्हाण वारंवार मागतात.सोबतच एक दोन चकरा मारल्यानंतर त्रुटी असून ५ हजार द्या काम करून देऊ म्हणून लाभार्थ्यांशी व्यवहार करतात.पंतप्रधान आवास ,शबरी ,रमाई घरकुल योजना या तिन्ही लाभार्थ्यांचे बिल काढण्यासाठी अभियंता चव्हाण आर्थिक शोषण करीत असून त्यांच्याकडील कार्यभार काढण्यात यावा अशी मागणी गटविकास अधिकाऱ्यांकडे दिलेल्या निवेदनातून केली आहे.यावेळी अनुसूचित जाती विभाग तालुका अध्यक्ष गौतम झाडे, कमलेश निमगडे, तुकाराम झाडे, राजीवसिंह चंदेल, सचिन फुलझले, वनिता वाघाडे, महेश सोनकुलवार, नामदेव सांगळे, बालाजी चनकापुरे, नवराज चंद्रगडे, अभय शेंडे, रेखा रामटेके उपस्थित होते.

“तक्रार प्राप्त झाली असून त्यासंदर्भात घरकुल लाभार्थ्यांची चौकशी करून पुढील कार्यवाही करण्यात येईल.” शेषराव भुलकुंडे गटविकास अधिकारी गोंडपिपरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here