गंगा सृष्टी चे संचालक गोरख गुंजाळ पाटील यांचे अकाली निधन.

0
572

गंगा सृष्टी चे संचालक गोरख गुंजाळ पाटील यांचे निधन.

Impact 24 news

अहमदनगर/संगमनेर/ प्रतिनिधी :- संगमनेर येथील प्रगतशील शेतकरी, गंगा सृष्टी चे निर्माते ,एक तरुण उद्दोजग गोरख गंगाधर गुंजाळ पाटील यांचे काल हृदय विकाराचा तीव्र धक्का आल्याने दुःखद निधन झाले, मृत्यू समयी ते ५५ वर्षाचे होते. त्यांचे मागे पत्नी, दोन मुले, दोन भाऊ असा मोठा परिवार आहे. १९८८ ला पुणे येथून बी एस सी शेती ही पदवी घेऊन त्यांनी नौकरी न करता शेती केली. त्यांचे अनेक मित्र राज्य सरकार मध्ये अधिकारी झाले ,पण त्यांनी आपले शेती हे क्षेत्र निवडले. शेतात विविध यशस्वी प्रयोग करणे हा त्यांचा छंद होता. डाळिंब पीक, भाजीपाला, ऊस या वर ते संगमनेर परिसरातील शेतकरी यांना कायम मार्गदर्शन करत असत. डाळिंब पिकाचे विक्रमी उत्पादन त्यांनी घेतले होते. शेतकरी आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याकरिता त्यांनी अनेकांना मार्गदर्शन केले आहे.

राष्ट्रवादी चे नेते अशोकराव भांगरे, शिर्डी चे राष्ट्रवादीचे नेते महेंद्र शेळके , दौलत उद्योग समूहाचे संजय देशमुख , कृषी अधिकारी संजय मोरे, आदी त्यांचे जवळचे मित्र होते. दूध धंद्यात ही त्यांनी एकवेळ मजल मारून , गंगा सृष्टी हा मोठा प्रकल्प उभा केला आहे. अल्पावधीतच गंगा सृष्टी ने त्यांच्या मार्गदर्शनामुळे गगन भरारी घेतली असून ,त्यांचे अकाली जाणे हे अपेक्षित नव्हते. काही दिवसापूर्वी त्यांना लिव्हर चा आजार झाला होता, अनेक उपचार करून ही त्यांनी काल संजीवनी हॉस्पिटल संगमनेर येथे अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने मोठा मित्र परिवार दुःखात बुडाला आहे. सुस्वभावी व प्रामाणिक भूमिका घेणारा मित्र आज गेला अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस चे ज्येष्ठ नेते अशोक भांगरे यांनी व्यक्त केली. त्यांच्या निधनाबद्दल जिल्हा सहकारी बँक चे माजी अध्यक्ष सीताराम पाटील गायकर, ज्येष्ठ नेते रावसाहेब गुंजाळ, शरद नाना थोरात, आमदार किरण लहामटे , आमदार सुधीर तांबे, राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आदींनी दुःख व्यक्त केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here