गरीबांना मदतीचा हात देवून महसुल कर्मचा-यांनी केली दीपावली साजरी ! चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केली या अभिनव उपक्रमाची प्रशंसा !

0
444

गरीबांना मदतीचा हात देवून महसुल कर्मचा-यांनी केली दीपावली साजरी ! चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केली या अभिनव उपक्रमाची प्रशंसा !

किरण घाटे

चंद्रपूर :- हल्ली दिव्यांची रोषणाई वाढली परंतु मनातला अंधार अधिकच दाटत गेला आहे. एकमेकांना सुखी व समाधानी करण्याची ही वृत्ती मागल्या तीनचार दशकात आपण गमावून बसलो आहोत. हे जरी खरे असले तरी ! एक सामाजिक बांधिलकीचा दृष्टीकोन डोळयांसमोर ठेवून आपणही समाजाचे देणे लागतो ! या भावनेने प्रेरित होऊन चंद्रपूर जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेने निव्वळ चंद्रपूरातच नव्हेतर संपूर्ण जिल्ह्याभरातील समाजात असलेल्या अतिशय गोरगरीब, पिडीत व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या परिवारांना -अकरा हजार रुपये राेख( रक्कम,) मिठाई, पणत्या, झाडु, ब्लॅकेट, साळीचोळी, जिवनाश्यक साहित्य व वस्तु भेट रुपाने दिल्या 🟢🟣महसुल कर्मचारी संघटनेने गरीबांना मदत करुन ही दिवाळी पैशाची न करता आपुलकीची व सहानभूतीची केली असल्याचे चित्र जिल्हाभर काल प्रत्यक्षात दिसून आले .चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना महसुल कर्मचारी संघटनेने नुकताच राबविलेला हा उपक्रम मनापासून आवडला. ते सुध्दा स्वताहुन या उपक्रमात सहभागी होणार होते. परंतु अतिशय महत्वाच्या कामामुळे त्यांचे या कार्यक्रमात येणे शक्य झाले नाही.या आयोजित कार्यक्रमाची त्यांनी ताेंडभरुन स्तुती केली व या उपक्रमास त्यांनी अंतकरणातुन शुभेच्छा दिल्या.आज काही ठिकाणी जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचारी यांनी भेटी दिल्या त्या वेळी हा छाेटा खानी कार्यक्रम बघुन त्यांचे मन अक्षरशा गहीवरुन आलं तर काही ठिकाणी चिमूकल्यांच्या चेहऱ्यांवरच तेज बघुन हिच आमच्या महसूल कर्मचारी वर्गांची खरी दिवाळी आहे.* असे पण त्यांना वाटले .एव्हढेच नाहीतर या जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या उपक्रमास जिल्हातील सर्वच तहसील व उपविभागीय कार्यालयातील कर्मचारी यांनी विस्तारीत स्वरुप दिले . दरम्यान तालुक्यातील सहाय्यक जिल्हाधिकारी तहसीलदार व उपविभागीय अधिकारी, यांनी आत्महत्याग्रस्त कुटूंबियांच्या घरी स्वत: उपस्थित राहून त्यांना भेटवस्तू दिल्या. या अभिनव उपक्रमाचे जिल्ह्यातील अनेक सामाजिक संघटनेच्या पदाधिका-यांनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here