प्रधानमंत्री फसल बिमा योजना अंतर्गत एक रुपयात विमा करुन घ्यावा…

0
283

प्रधानमंत्री फसल बिमा योजना अंतर्गत एक रुपयात विमा करुन घ्यावा…

आज दिनांक 14 जुलै रोजी मौजा वेंडली तालुका चंद्रपूर येथे ई पीक पाहणी संदर्भात प्रात्यक्षिक करून ई पीक नोंदणी व पीक विमा काढण्याबाबत प्रबोधन करण्यात आले. या वेळी चंद्रपूर चे तहसीलदार विजय पवार,नायब तहसीलदार सचिन खंडाळे, पिपरीचे तलाठी, वेंडली चे पोलिस पाटील व गावातील शेतकरी बंधू उपस्थीत होते.
तालुका प्रशासनाच्या वतीने तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येते की दिनांक 1 जुलै 2023 पासून खरीप हंगामा साठी ई पीक नोंदणी ला सुरुवात झाली असून सर्व शेतकऱ्यांनी तत्काळ ई पीक नोंदणी करून घ्यावी. तसेच दिनांक 31 जुलै पर्यंत प्रधानमंत्री फसल बिमा योजना अंतर्गत 1 रुपयात पीक विमा करून घ्यावा. पीक विमा संदर्भात गावातील सर्व सेतू चालकांना या पूर्वीच ई पीक विमा बाबत सूचना देण्यात आल्या आहेत. ई पीक नोंदणी न केल्यास सातबारा वर पिकाची नोंद नसल्यास भविष्यात नुकसान भरपाई मिळण्यास अडचण येऊ शकते सबब सर्व शेतकरी बंधूंनी तत्काळ ई पीक नोंदणी व पीक विमा करून प्रशासनास सहाय्य करावे असे आवाहन तालुका प्रशासनाकडून करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here