गोंडवाना विद्यापीठात २ ते ५ ऑक्टोबर या कालावधीत वर्धापन दिन आणि दशमानोत्सव सोहळ्याचे आयोजन

0
453

गोंडवाना विद्यापीठात २ ते ५ ऑक्टोबर या कालावधीत वर्धापन दिन आणि दशमानोत्सव सोहळ्याचे आयोजन

 

गडचिरोली, सुखसागर झाडे

गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाला दहा वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल २ ते ५ ऑक्टोबर या कालावधीत वर्धापन दिन आणि दशमानोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ.श्रीराम कावळे यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

२ ऑक्टोबरला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असून, राज्याच्या लोकलेखा समितीचे अध्यक्ष आ.सुधीर मुनगंटीवार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. कुलगुरु डॉ.श्रीनिवास वरखेडी हे अध्यक्षस्थानी राहतील. यावेळी विद्यापीठाच्या वतीने जिल्हा सामान्य रुग्णालयाकरिता अत्याधुनिक सुविधायुक्त रुग्णवाहिकेचे लोकार्पण अतिथींच्या हस्ते होणार आहे.

या कार्यक्रमात डॉ.तु.वि.गेडाम यांना ‘जीवन साधना गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. शिवाय विद्यापीठातील उत्कृष्ठ अधिकारी, कर्मचारी, प्राचार्य आदींना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. ३ ऑक्टोबरला पदव्युतर शैक्षणिक विभाग व ज्ञानस्तोत केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विद्यार्थ्यांच्या वाचन सवयी विकसित करण्यात ग्रंथालयांची भूमिका’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. बहुजन कल्याण व आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उदघाटन होईल. यावेळी सिने अभिनेता नितीश भारद्वाज उपस्थित राहणार आहेत. शिवाय अन्य दोन दिवसही विविध कार्यक्रम होणार आहेत. हे सर्व कार्यक्रम धानोरा मार्गावरील महाराजा सभागृहात होणार असल्याची माहिती प्र-कुलगुरु डॉ.श्रीराम कावळे यांनी दिली. पत्रकार परिषदेला कुलसचिव डॉ.अनिल चिताडे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here