४ ऑक्टोबरला ग्रामपंचायत कार्यालय राजूर येथे विशेष ग्रामसभेचे आयोजन

0
424

४ ऑक्टोबरला ग्रामपंचायत कार्यालय राजूर येथे विशेष ग्रामसभेचे आयोजन

वणी/यवतमाळ, मनोज नवले

या विशेष ग्रामसभेत गावकऱ्यांच्या संबधित जसे संत गाडगेबाबा अभियान राबवणे, विकास कामाचा आढावा घेणे व वेळेवर येणाऱ्या विषया संबधित चर्चा करण्यात येणार आहे. परंतु शासनाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक तत्वाचे पालन करावयाचे आहे. या सभेला येताना मास्क अनिवार्य आहे.

या विशेष ग्रामसभेला मोठ्या संख्येने गावकऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन सरपंच विद्या पेरकावार, उपसरपंच अश्विनी बलकी, सचिव महेंद्र चाहनकार व ग्रामपंचायत सदस्यांनी केले आहे.

“मागील काही कालावधी हा कोव्हिडं-१९ चा होता. हे सर्व जगाला माहीत आहे. आणि त्यात बिनबुडाचे आरोप केल्या जात आहे की, १५ महिन्यात कोणतीही ग्रामसभा घेतली नाही. म्हणजेच जनतेला भ्रमित करण्याची रणनीती म्हणावी लागेल. तरीही शासनाच्या आदेशाचे ग्रामपंचायतने पालन केले. १४४ कलम (जमावबंदी) लागू होती. त्यात ५ व्यक्तींच्या वर एकत्र येता येत नव्हते आणि कोरोनाचा कहर गावातही मोठ्या प्रमाणात होता. याची जाण असेलच म्हणून ग्रामसभा ह्या बंदच होत्या. मग ग्रामसभा १५ महिन्यात घेण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणून मी लावलेल्या आरोपाचेही खंडण करतो. २०१८ च्या आदेशात वर्षातून ४ ग्रामसभा घेण्याचा निर्णय आहे. परंतु त्यातही काही सण येत असेल तर ते घेता येत नाही, असे जाहीर आदेशानुसार दिलेले आहे.”महेंद्र चहाणकर (ग्रापं सचिव)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here