नांदा फाटा येथील निशुल्क मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी ६७ नागरिकांची निवड

0
405

नांदा फाटा येथील निशुल्क मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी ६७ नागरिकांची निवड

समता फाउंडेशन, स्वामी विवेकानंद युवा मंडळ, युवा मित्रपरिवार नांदा फाटा, यांचा पुढाकार

 

 

नांदा फाटा :– १५ आगस्ट ला स्वातंत्रदिनी देशभरात ७५ वा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्सवात साजरा होत आहे. याच पार्श्वभूमीवर स्वामी विवेकानंद युवा मित्र मंडळ व युवा मित्र परिवार, नांदा फाटा,आचार्य विनोबा भावे सावंगी (मेघे) वर्धा,जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर व प्राथमिक आरोग्य केंद्र नांदा फाटा यांच्या सहकार्याने समता फाउंडेशन द्वारा निशुल्क मोतीबिंदू लेन्स, नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन केले होते.

शिबिरात महिला व पुरुष मंडळी असे एकत्रीत २१३ नागरिकांनी नोंदणी करून नेत्र तपासणी करून घेतली त्यात ६७ मोती बिंदू असलेल्या नागरिकांची शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली.

सदर कार्यक्रमा प्रसंगी नेत्र चिकित्सक डॉ. बर्हान, वैद्यकीय अधिकारी डॉ. कुरेशी, प्राथमिक आरोग्य केंद्र येथिल डॉ. राहुल लांडगे, समता फाऊंडेशन चे राहुल मोगरकर, पुरुषोत्तम निब्रड, अभय मूनोत उपस्थित होते.

प्रसंगी पूर परिस्थितीत आपल्या जीवाची बाजी लावत तब्बल सात तास प्रवास करून गरोदर महिलेला चंद्रपूर येथे घेऊन जाणाऱ्या आशा लता गेडाम यांचा शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाचे संचालन सतीश जमदाडे यांनी केले तर आभार सचिन बोढाले यांनी मानले कार्यक्रमाचा यशस्वीते करीता प्राथमिक आरोग्य केंद्र येथील कर्मचारी, आरोग्य सेविका, आशा, व युवक मित्र परिवार नांदा फाटा यांनी अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here