युवा संकल्प संस्था शाखेकडून आष्टी ग्रामपंचायत परिसरात वृक्षारोपण

0
541

युवा संकल्प संस्था शाखेकडून आष्टी ग्रामपंचायत परिसरात वृक्षारोपण

गडचिरोली, ✍️सुखसागर झाडे

युवा संकल्प संस्था शाखा आष्टी च्या वतीने आज दिनांक- 08 जुलै रोजी ग्रामपंचायत कार्यालय परिसरात वृक्षारोपण करून सदर वृक्षाचे संवर्धन करण्याचा संकल्प घेण्यात आला. दैनंदिन जीवनात वृक्षाचे काय महत्त्व आहे हे पटवून देत विविध प्रजातीचे वृक्षारोपण करण्यात आले. प्रत्येक व्यक्तीने जिवनात वृक्ष लागवड व संवर्धनाची किमया अशीच जिवनात राबविली तर निसर्गरम्य वातावरण,शुद्ध आक्सीजन येणाऱ्या पिढी पर्यंत पोहचवता येईल. या सदर वृक्षारोपन कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून ग्रा.प.आष्टीच्या सरपंच बेबीताई बुरांडे ,प्रमुख पाहुणे म्हणून पो.निरिक्षक कुमारसिंग राठोड पो. स्टे.आष्टी, ठाकरी ग्रा.प.सरपंच नंदाताई कुलसंगे , प्रकाश बोबाटे सर ,युवा संकल्प संस्था शाखा आष्टी प्रमुख विशाल बंडावार, सदस्य दिशांत बोमकंटीवार, गुलशन बंडावार, ग्रा. पं. संगणक परिचालक निशा उंदिरवाडे तथा ग्रामपंचायत आष्टीचे कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here