भारतीय कामगार सेना मुंबई रुग्णालय युनिट तर्फे संचालक मंडळाची निवडणूक व जाहिर सत्कार समारंभ प्रारंभ

265

भारतीय कामगार सेना मुंबई रुग्णालय युनिट तर्फे संचालक मंडळाची निवडणूक व जाहिर सत्कार समारंभ प्रारंभ

 

मुंबई प्रतिनिधी : महेश कदम
बॉम्बे हॉस्पिटल को- ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटीच्या सर्व संचालक संस्थेची समिती सदस्य पदासाठी पंचवार्षिक निवडणूक २०२२ ते २०२७ या कालावधीसाठी दिनांक ०४/११/२०२२ रोजी घेण्यात आली. निवडणूक निर्णय संस्थेच्या एकूण सभासदांपैकी ३० सभासदानी उमेदवारी अर्ज दाखल केले त्यापैकी सर्व साधारण मतदार संघात १८ उमेदवार, महिला राखीव मतदार संघात ०६, अनुसूचित जाती जमाती मध्ये ०२ उमेदवर तसेच भटक्या विमुक्त जाती जमाती मतदार संघातून ०४ उमेदवार निवडणुकीसाठी उभे होते. निवडणूक अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडले, बॉम्बे हॉस्पिटल व्यवस्थापन यांनी फार मोलाचे सहकार्य केले. मा. श्री. रमेश भट्टड साहेब (एच आर डी डायरेक्टर) तसेच त्यांच्या सहकारी यांनी सर्व नियोजन व्यवस्थित केल्याने निवडणुक सुरळीत पार पडली. संस्थेचे व्यवस्थापक यांनी सर्व व्यवस्था उत्तम प्रकारे केली. भारतीय कामगार सेना, मुंबई रुग्णालय युनिट तर्फे जाहीर सत्कार समारंभ आयोजित करण्यात आले. बॉम्बे हॉस्पिटल को. ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या सर्व नवनियुक्त संचालक चे नावे पुढील प्रमाणे श्री. महेंद्र हरचंदे, श्री. सुनील चिकणे, श्री. विजय दळवी, श्री.अमृतलाल खुमान, श्री. रमेश कसबे, श्री. सरजू म्हात्रे, पल्लवी शिंदे, शिल्पा पवार, श्री. गणेश वरणकर, श्री. मंगेश गायकवाड व श्री. संतोष पाटील या सर्वांचा सत्कार शिवसेना जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख मा. श्री. संजय हरिश्चंद्र सावंत यांच्या विशेष उपस्थित शुक्रवार दिनांक ११ नोव्हेंबर २०२२ रोजी दुपारी ३:०० वाजता करण्यात आले होते. हा संपूर्ण सत्कार समारंभ युनिट चे अध्यक्ष श्री. राजु नायर यांच्या देखरेखीत पार पडले व सर्व विजयी उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले.

advt