बेलारा येथे वं. राष्टसंत तुकडोजी महाराजांची ५२ वि पुण्यतिथी साजरी

0
530

बेलारा येथे वं. राष्टसंत तुकडोजी महाराजांची ५२ वि पुण्यतिथी साजरी

विकास खोब्रागडे

पळसगांव(पिपर्डा)संपूर्ण जगाला मानवतेची शिकवण देणारे राष्टसंत तुकडोजी महाराजांची ५२वि पुण्यतिथी गुरुदेव सेवा मंडळ बेलारा च्या वतीने साजरी करण्यात आली.
राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव धार्मिक महोस्तव यावर शासनाची कायम असलेली बंदी लक्षात घेऊन गुरुदेव भक्तांनी गावातच कोविड नियमांचे पालन करून मानवतेचे महान पुजारी वंदनीय राष्टसंत तुकडोजी महाराजांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
घटस्थापना करून भजन कीर्तनाच्या कार्यक्रमानि कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली,परिसरातील भजने मंडळांनी आपली उपस्थिती दर्शवून भजने सादर करण्यात आली,पहाटे पाच वाजता सामूहिक ध्यान व स्वछता अभियान राबविण्यात आले,गावकरी यांनी आपल्या घर समोरील रस्तावर सडा ,रंगोळी टाकुन परिसर स्वच्छ करण्यात आला. गावातून नाचत गाजत रामधून काढण्यात आली.मनोगता द्वारे श्रद्धांजली अर्पण करून महाप्रसादाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला.या वेळी परसराम ननावरे,मधुकर दांडेकर,विहिरगाव, रामदास जांभुळे,मदनापूर,ह.भ.प.चौधरी महाराज,आशा मोहूर्ले पोलीस पाटील,संदीप पेटकुले तंटा मुक्त अद्यक्ष तथा गावातील तरुण मंडळी महिला वर्गाचे मोलाचे सहकार्य लाभले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here