कुंभारखणी गावात ग्रामसेवकच येईना…

0
508

कुंभारखणी गावात ग्रामसेवकच येईना…

आमची कामे वेळेवर होत नाही अशी कुंभारखणी ग्रामस्थांची ओरड

 

यवतमाळ : वणी तालुक्यातील कुंभारखणी असे गाव आहे ज्या गावात ग्रामसेवक फक्त कामापुरतेच हजर होतात. आणि बाकी दिवस त्यांच्याशी मोबाईलवर बोलुन कधी येता साहेब असे गावातील लोकांना विचारावे लागते. तेव्हा साहेब आलेला फोन उचलून बोलायला तयार नसतात किंवा साहेबाचा फोनच बंद असतो. त्यामुळे ग्रामस्थांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.

असे अनेकदा गावातील लोकांसोबत घडले आहे. तेव्हा लोकांना कामधंदे बाजूला ठेवून ग्रामसेवकांच्या घरी जावे लागते. तर ग्रामसेवक सुध्दा
गावातील समस्या सोडविनारा कर्मचारी असतो आणि त्याची काही कामे असतात पण ग्रामपंचायत कुंभारखनी येथिल फिल्टरचे मागिल 12 महिन्यापासुन विज बिल थकित असुन दि. 30 ऑक्टोंबर 2021 रोजी फिल्टरचे देयक भरले नसल्याने विज कनेक्शन तोडण्यात आले आहे. तरी कुंभारखनी ग्रामपंचायतच्या सचिवाच्या हलगर्जीपणामुळे फ़िल्टरचे देयक भरन्यात आले नाही.

तसेच ग्रामसेवक या गावाकडे दुर्लक्ष करत आहे. तर ग्रामसेवक यांना महावितरण कडून वारंवार सुचना करन्यात आल्या होत्या तरी देयक भरले नाही.

ग्रामसेवक महिन्यातुन एकदाच गावात येतो. फ़क्त इजासन ला येवुन सरपंच यांच्या घरी भेट देवुन वापस जातात. तसेच ग्राम पंचायत कुंभारखणी येथील विज देयक थकित असल्याने पथदिव्यांचे कनेक्शन कापण्यात आले आहे.

तर कुंभारखनी ग्रामपंचायतीचे कार्यालयीन कामे व सर्व सामान्य लोकांचे काम ठप्प पडले आहे. ग्रामसेवक हा शासनाच्या कर्मचारी असून सुध्दा गावात येत नसल्याने गावाचा विकास खोंळबला आहे. आणि २ ऑक्टोबर रोजी होणारी ग्रामसभा अजूनही गावात झाली नाही. असा कुंभारखणी गावातील लोकांमधून सुर निघत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here