कार आणि टू व्हीलरच्या धडकेत एकाच कुटुंबातील तिघे गंभीर जखमी.

0
1116

कार आणि टू व्हीलरच्या धडकेत एकाच कुटुंबातील तिघे गंभीर जखमी.

चिंतलधाबा-पोंभुर्णा मार्गावरील साईकृपा विद्यालय जवळील घटना.

पोंभुर्णा:- चिंतलधाबा-पोंभुर्णा मार्गावर साईकृपा विद्यालय जवळ कार आणि टू व्हीलरचा अपघात झाल्याची घटना आज घडली.या अपघातात एकाच घरचे तिघे गंभीर जखमी झाले. गंभीर जखमी व्यक्तींची नावे कालिदास सुखदेव उईके (वय अंदाजे ३०), अनिल सुखदेव उईके वय अंदाजे २२, पियुष पुरुषोत्तम उईके (वय ११ वर्षे) हे चिंतलाधाबा येथील रहिवासी आहे. ते आपल्या शेतात जाण्याकरिता निघाले असता पोंभुर्णा या मार्गावरुन येत असलेल्या भरधाव कारने त्यांना धडक दिली धडक एवढि जबर होती की यात तिघांचेही पायाला गंभीर दुखापत झाली. या धडकेत तीन युवक गंभीर जखमी झाले.त्यांना पोंभुर्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.व तेथुन सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे.पुढिल तपास पोंभुर्णा पोलिस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here